

Why Stock Market Crash Today: बिहार विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेत यांचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीसह लाल रंगात व्यवहार करु लागले. आज शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात निफ्टी 80 अंकांनी घसरून 25,800 च्या खाली, तर सेन्सेक्स 254 अंकांनी घसरून 84,225 वर आला. बँक निफ्टीमध्येही तब्बल 100 अंकांची घसरण झाली.
IT, FMCG आणि ऑटो क्षेत्रात मोठी घसरण
PSU बँक आणि प्रायव्हेट बँक इंडेक्स मात्र हिरव्या रंगात
टाटा मोटर्स CV मध्ये 3% पेक्षा जास्त शेअर घसरला
BSE च्या टॉप 30 पैकी 17 शेअर्स घसरले होते, तर Asian Paints, Trent यांसारखे काही शेअर्स तेजीत आहेत.
डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करणार नाही. यामुळे आशियाई बाजारांमध्ये विक्री वाढली आणि त्याचा परिणाम भारतावरही झाला.
बिहार विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल येऊ लागले असून एनडीए आघाडीवर असली तरी RJD जोरदार टक्कर देत आहे. निवडणुकीच्या अनिश्चित वातावरणाने बाजार सावध झाला आहे.
Sonata Software – 5% घसरण
Tilaknagar Industries – 5% घसरण
LG Electronics – 2.5% घसरण
ITI Ltd – 2% घसरण
Muthoot Finance – 9% वाढ
Jubilant FoodWorks – 8% वाढ
BDL – 5% पेक्षा जास्त वाढ
Expleo Solutions – 16%
Man Industries – 14%
Transformers & Rectifiers India – 10% अपर सर्किट
(नोंद- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)