Pune Water Supply: पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शुक्रवारी कमी दाबाने येणार पाणी

देखभाल दुरुस्ती व फ्लो मीटर बसविण्याच्या कामांसाठी निर्णय; नागरिकांना पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन
Pune Water Supply:
Pune Water SupplyFile Photo
Published on
Updated on

पुणे : विविध जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच फ्लो मीटर बसवणे, व्हॉल्व्ह बसवणे आदी कामांसाठी गुरुवारी (दि 20) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी (दि 21) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी या दिवशी सहकार्य करून पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत केले आहे.

Pune Water Supply:
PMC Election History: जळालेल्या कचेरीने दिला ऐतिहासिक विजय

खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत 3000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. खडकवासला धरणातून दोन 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनी 3000 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्यात आले आहेत. खडकवासला ते पर्वती 3000 मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीवरील फ्लो मीटर बसविणे व 1400 मिलिमीटर वाहिनीवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बसविणे या करिता 1400 मिलिमीटर व्यासाचे व्हॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत. याच्या तपासणीसाठी व वडगाव जलशुद्धीकरण फेज 2 ची क्षमता वाढविण्यासाठी नवीन टाकीच्या भिंतीला कोअर कटिंग करण्यासाठी तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा सकाळी सहा ते रात्री बारा बंद ठेवावा लागणार आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Pune Water Supply:
Ramtekdi Election Battle: प्रभाग 17 मध्ये राजकीय पेच! राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?

या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (500 एमएलडी), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारितील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एसएनडीटी एचएलआर टाकी व एमएलआर टाकी परिसर, चतृ:श्रुंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. 1 व 2, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बूस्टर पंपिग अंतर्गत येणारा परिसर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news