

Stock Market Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे सोमवारी (3 नोव्हेंबर) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 अंकांनी घसरुन 25,700 च्या खाली आला. बँक निफ्टी मात्र वाढीसह 30 अंकांनी वर होता. याउलट स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सनी पुन्हा जोर दाखवला. स्मॉलकॅप निर्देशांक 100 अंकांनी, तर मिडकॅप 40-50 अंकांनी वाढला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (PSU Banks) शेअर्स जोरदार वाढले, तसेच मेटल आणि ऑटो सेक्टरमध्येही तेजी पाहायला मिळाली.
निफ्टी 50 निर्देशांकात Shriram Finance, M&M, Indigo, SBI, ONGC, Apollo Hospital आणि Eicher Motors हे प्रमुख शेअर्स वाढले. तर Maruti, BEL, Titan, Bajaj Finance, Adani Ports, Axis Bank आणि Dr. Reddy’s हे प्रमुख शेअर्स घसरले.
गेल्या आठवड्यात बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. परदेशी गुंतवणूकदारांची (FII) मोठ्या प्रमाणात विक्री आणि डॉलरमधील वाढीमुळे बाजारावर दबाव होता. तरीही सरकारच्या वाढत्या खर्चामुळे आणि मजबूत जीएसटी संकलनामुळे बाजारातील भावना स्थिर होत्या.
शुक्रवारी परकीय गुंतवणूकदारांनी (FIIs) 6,770 कोटी रुपयांची विक्री केली आणि एकूण 9,321 कोटी रुपये बाजारातून काढले. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 46व्या दिवशी खरेदी चालू ठेवली आणि 7,070 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आजच्या सत्रात सरकारी आकडे, कॉर्पोरेट निकाल आणि जागतिक ट्रेंड्स बाजाराला दिशा देतील.
सरकारी खर्चात 40 टक्क्यांची वाढ झाली असून आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच 52 टक्के कॅपेक्स लक्ष्य पूर्ण झाले आहे. वित्तीय तूट (Fiscal Deficit) सुद्धा 36.5 टक्क्यांवर नियंत्रणात आहे.
BPCL, Bank of Baroda आणि Phoenix Mills यांचे निकाल चांगले होते. Patanjali Foods चे निकाल चांगले तर Godrej Consumerने निराशा केली. आज Titan, Bharti Airtel, Power Grid आणि Tata Consumer यांच्या निकालांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
गोवा सरकारने तक्रारींच्या पार्श्वभूमीवर Ola Electric च्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि कंपनीचे ट्रेड सर्टिफिकेट सस्पेंड केले आहे. दरम्यान, इस्रोने एक ऐतिहासिक पाऊल उचलत ‘बाहुबली’ रॉकेटद्वारे भारतातील आतापर्यंतचा सर्वात जड 4,410 किलोचा CMS-03 सॅटेलाइट यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे.