

Gold Rate Today: देशात पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज 3 नोव्हेंबरला दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव कमी होऊन 1 लाख 23 हजार 140 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. गेल्या आठवडाभरात 24 कॅरेट सोने तब्बल 2 हजार 620 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोने 2 हजार 400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. देशातील प्रमुख शहरांतील आजचे भाव पाहूयात.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 1 लाख 23 हजार 140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 12 हजार 890 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तिन्ही शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 12 हजार 740 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 22 हजार 990 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
पुणे आणि बेंगळुरूमध्येही सोन्याचे भाव जवळपास सारखेच आहेत. येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 22 हजार 990 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 12 हजार 740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोने जसे स्वस्त झाले, तसेच चांदीतही घट झाली आहे. आज 3 नोव्हेंबरला सकाळी चांदीचा भाव 1 लाख 51 हजार 900 रुपये प्रति किलो इतका होता. मागील एका आठवड्यात चांदीच्या किमतीत 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात चांदीचा भाव कमी झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा भाव 48.97 डॉलर प्रति औंस इतका आहे. देशांतर्गत घटकांसह जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार आणि गुंतवणुकीचे जागतिक ट्रेंड, या सर्व घटकांचा परिणाम सध्या सोन्या-चांदीच्या बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे.