

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने घसरणीसह सुरुवात केली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली आणि तो 200 हून अधिक अंकांनी घसरला. निफ्टीतही दबाव कायम असून तो 80 अंकांनी घसरत 26,000 च्या खाली आला. बँक निफ्टीतही सुमारे 100 अंकांची घसरण झाली आहे.
ब्रॉडर मार्केटमध्येही विक्रीचा सूर दिसत होता. बाजारातील अस्थिरता मोजणारा India VIX सुमारे 5 टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. मीडिया आणि Nifty MidSmall IT & Telecom इंडेक्स वगळता जवळपास सर्वच सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात व्यवहार करत होते. विशेषतः ऑटो, हेल्थकेअर, फार्मा आणि रिअल्टी शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
आज शेअर बाजारात काही निवडक शेअर्समध्ये तेजी दिसून आली. IndiGo, Shriram Finance, Asian Paints, UltraTech Cement, HUL आणि Adani Enterprises या शेअर्समध्ये वाढ झाली. मात्र दुसरीकडे ONGC, M&M, Trent, Eicher Motors, Cipla, Max Healthcare आणि Apollo Hospitals हे शेअर्स सर्वाधिक घसरले.
आज सकाळी जागतिक आणि देशांतर्गत संकेत काहीसे नकारात्मक होते. अमेरिकन बाजारात विक्रमी पातळी गाठल्यानंतर जोरदार प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाले. याचा परिणाम आशियाई तसेच भारतीय बाजारांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी डाओ आणि Russell 2000 यांनी इंट्राडेमध्ये लाइफ हाय गाठला होता, मात्र त्यानंतर डाओ 245 ते 250 अंकांनी घसरला, तर AI शेअर्सच्या विक्रीमुळे Nasdaq जवळपास 400 अंकांनी कोसळला.
कमोडिटी बाजारात संमिश्र चित्र दिसत आहे. सोने अद्यापही तेजीत असून विक्रमी पातळीच्या आसपास व्यवहार करत आहे. चांदीत मात्र प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. कच्चे तेल सुमारे 61 डॉलर प्रति बॅरल या पातळीवर आहे, तर कॉपर लाइफ हायवरून खाली आला आहे. याचा परिणाम मेटल शेअर्सवर दिसण्याची शक्यता आहे.
डॉलरसमोर रुपया घसरत असल्यामुळे आयातीवर अवलंबून असलेल्या कंपन्यांवर दबाव येऊ शकतो आणि महागाईची चिंता वाढू शकते. मात्र IT आणि एक्सपोर्टशी संबंधित शेअर्सना यामुळे काही प्रमाणात आधार मिळू शकतो.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग 12व्या दिवशी विक्री सुरू ठेवली असून शुक्रवारी त्यांनी सुमारे 1,034 कोटी रुपयांची विक्री केली. याउलट, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार (DII) सलग 75व्या दिवशी खरेदीदार राहिले आणि बाजारात सुमारे 3,900 कोटी रुपये गुंतवले.