

Gold Price Today India: आठवड्याची सुरुवात होताच सोन्या-चांदीच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत तेजीत असलेल्या सोन्याच्या भावाला ब्रेक लागला आहे, देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत. आज 15 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1,34,060 रुपयांवर पोहचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,890 रुपये आहे.
विशेष म्हणजे, आज घसरण दिसत असली तरी मागील एका आठवड्यात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. अवघ्या सात दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या भावात सुमारे 3,770 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्याच्या भावात 3,450 रुपयांची वाढ झाली होती.
देशातील प्रमुख शहरांमध्येही आज सोन्याचे भाव जवळपास समान पातळीवर आहेत. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,33,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,740 रुपये आहे. पुणे आणि बेंगलुरु या शहरांमध्येही याच भावावर सोन्याची खरेदी-विक्री सुरू आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये फारसा फरक दिसत नाही.
2025 हे वर्ष सोन्यासाठी फायदेशीर ठरले आहे. देशांतर्गत बाजारात आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि रुपयाची घसरण या घटकांमुळे सोन्याचे भाव वाढले. तज्ज्ञांच्या मते, जर आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारशी बदलली नाही आणि रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला, तर 2026 मध्ये सोन्याचे भाव आणखी 5 ते 16 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या भावातही आज घसरण झाली आहे. चांदीचा भाव 1,97,900 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. मात्र, मागील आठवड्यात चांदीत तब्बल 8,000 रुपयांची वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव सध्या 64.57 डॉलर प्रति औंस इतका आहे.