Silver Price Forecast: चांदीचा भाव 6 लाख रुपयांपर्यंत जाणार? रॉबर्ट कियोसाकी यांनी केलं मोठं भाकीत; गुंतवणूक करावी का?

Silver Price Forecast Robert Kiyosaki: चांदीच्या किमतींनी नवे विक्रम मोडले असतानाच ‘Rich Dad Poor Dad’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी मोठं भाकीत केलं आहे. चांदीचा दर 6 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो.
Silver Price Forecast Robert Kiyosaki
Silver Price Forecast Robert KiyosakiPudhari
Published on
Updated on

Silver Price Forecast Robert Kiyosaki: ‘चांदीत गुंतवणूक करायला उशीर झाला का?’ हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना सध्या पडत आहे. यावर जगप्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांनी यावर थेट उत्तर दिलं आहे. 'Rich Dad Poor Dad' या पुस्तकामुळे प्रसिद्ध झालेल्या कियोसाकी यांच्या मते, चांदीची तेजी अजून संपलेली नाही, उलट आता सुरुवात होत आहे.

“चांदी 6 लाख रुपये किलोपर्यंत जाऊ शकते”

कियोसाकी यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 70 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेला आहे. भारतीय रुपयांमध्ये हा दर सुमारे 2.2 लाख रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र, “हा सर्वोच्च दर आहे असं वाटत असेल, तर ते चुकीचं आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या मते, 2026 पर्यंत चांदी 200 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते, म्हणजेच जवळपास 6.3 लाख रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकते.

“मी स्वतः अजूनही चांदी खरेदी करतो”

रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की, त्यांनी 1965 साली पहिल्यांदा चांदी खरेदी केली, तेव्हा चांदीचा दर एका डॉलरपेक्षाही कमी होता. विशेष म्हणजे, आज दर 70 डॉलर असतानाही ते चांदी खरेदी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी अजूनही चांदी घेतोय. कारण मला वाटतं की चांदीचा प्रवास अजून खूप लांब आहे,” असं त्यांनी म्हटलं.

Silver Price Forecast Robert Kiyosaki
Supriya Sule: सुप्रिया सुळेंना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद? राज्यात अजित पवारच ‘दादा', इनसाइड स्टोरी समोर

गुंतवणूक करण्याआधी स्वतः अभ्यास करा

कियोसाकी यांनी एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. त्यांनी लोकांना सांगितलं की, कोणाच्याही सांगण्यावरून थेट गुंतवणूक करू नका. “यूट्यूबवर वेगवेगळी मतं ऐका, फायदे-तोटे समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. सुरुवात लहान रकमेपासून करा. चुका झाल्या तरी त्यातून शिकता येतं. ज्ञान तुमच्या डोक्यात आणि हातात असेल, तर खरी संपत्ती तुमच्याजवळच राहते,” असं त्यांनी सांगितलं.

चांदी आणि सोन्याने मोडले विक्रम

दरम्यान, चांदीच्या किमतींनी भारतात नवा उच्चांक गाठला आहे. एमसीएक्स (MCX) वर मार्च 2026 च्या चांदी फ्युचर्सचा दर 2.32 लाख रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. केवळ पाच दिवसांत चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी सोन्याचाही भाव वाढत असून 10 ग्रॅम सोन्याने 1.39 लाख रुपयांचा टप्पा पहिल्यांदाच पार केला आहे.

Silver Price Forecast Robert Kiyosaki
Salman Khan: दुबईमध्ये आलिशान बंगला, गाड्या आणि अपार्टमेंट... सलमानने 37 वर्षांत किती कोटींचे साम्राज्य उभारले?

सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?

चांदी आणि सोन्यातील तेजी आकर्षक वाटत असली, तरी तज्ज्ञांच्या मते कोणतीही गुंतवणूक जोखीम लक्षात घेऊनच करायला हवी. कियोसाकी यांचं मत आशावादी असलं, तरी अंतिम निर्णय घेताना स्वतःचा अभ्यास, आर्थिक स्थिती आणि दीर्घकालीन उद्दिष्टं महत्त्वाची ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news