Salman Khan: दुबईमध्ये आलिशान बंगला, गाड्या आणि अपार्टमेंट... सलमानने 37 वर्षांत किती कोटींचे साम्राज्य उभारले?

Salman Khan Net Worth 2025: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आज सुमारे 2900 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. रिअल इस्टेटच्या बाबतीतही सलमान खान आघाडीवर आहे.
Salman Khan Net Worth
Salman Khan Net WorthPudhari
Published on
Updated on

Salman Khan Net Worth 2025: बॉलीवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळख असलेला सलमान खान आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेली जवळपास चार दशकं सलमान खान सिनेसृष्टीत आहे. अभिनय, ब्रँड व्हॅल्यू आणि व्यवसाय याच्या जोरावर त्याने आज हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे.

सलमान खानने 1988 साली ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘दबंग’, ‘बजरंगी भाईजान’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधून त्याने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. रोमँटिक हिरोपासून अ‍ॅक्शन स्टारपर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका त्याने यशस्वीपणे साकारल्या.

आज सलमान खानची एकूण संपत्ती सुमारे 2,900 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं मानलं जातं. चित्रपटांबरोबरच जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट आणि विविध प्रोजेक्ट्समधून तो मोठी कमाई करतो. प्रत्येक चित्रपटासाठी सलमान खान 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो, त्यामुळे तो बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

रिअल इस्टेटच्या बाबतीतही सलमान खान आघाडीवर आहे. मुंबईच्या वांद्रे भागात असलेलं त्याचं गॅलेक्सी अपार्टमेंट हे त्याचं कायमचं घर असून त्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. हे ठिकाण त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्यटनस्थळच बनलं आहे.

याशिवाय पनवेलजवळ असलेलं सलमान खानचं आलिशान फार्महाऊसही नेहमी चर्चेत असतं. सुमारे 150 एकर क्षेत्रात पसरलेलं ‘अर्पिता फार्म’ हे फार्महाऊस स्विमिंग पूल, जिम, प्राण्यांसाठी शेल्टर आणि सर्व लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहे. अनेकदा चित्रपटांच्या शूटिंगसाठी आणि खासगी पार्टींसाठी या फार्महाऊसचा वापर केला जातो.

Salman Khan Net Worth
Supriya Sule: सुप्रिया सुळेंना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद? राज्यात अजित पवारच ‘दादा', इनसाइड स्टोरी समोर

सलमान खानची भारताबाहेरही मालमत्ता आहे. दुबईतील बुर्ज पॅसिफिक आणि द अ‍ॅड्रेस डाऊनटाउन येथे आलिशान अपार्टमेंट्स आहेत. यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकही मोठी असल्याचं दिसून येतं.

लक्झरी गाड्यांचा चाहता असलेला सलमान खान अनेक महागड्या कार्सचा मालक आहे. रेंज रोव्हर, टोयोटा लँड क्रूझर, निसान पॅट्रोल, ऑडी RS7, BMW X6 आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या गाड्या त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत.

Salman Khan Net Worth
Pune NCP Alliance: पुण्यात राष्ट्रवादीची युती तुटली? शरद पवारांची काँग्रेस आणि ठाकरेंसोबत चर्चा सुरु, नेमकं काय घडलं?

अभिनयासोबतच सलमान खान सामाजिक कामांसाठीही ओळखला जातो. ‘बीइंग ह्यूमन’ फाउंडेशनच्या माध्यमातून तो आरोग्य, शिक्षण आणि गरजूंसाठी विविध उपक्रम राबवतो.

थोडक्यात सांगायचं तर, 37 वर्षांच्या कारकिर्दीत सलमान खानने मेहनत, लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यूच्या जोरावर आज हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news