

सांगली : गेल्या महिन्याभरापासून रोज सोन्या-चांदीच्या दरात नवे विक्रम होत आहेत. शुक्रवारी सोन्याचा दर जीएसटीसह प्रतिदहा ग्रॅमला 1 लाख 43 हजार 170, तर चांदीचा दर प्रतिकिलोस 2 लाख 36 हजार 900 रुपये झाला.
चार महिन्यांपासून सोन्या-चांदीचे दर खूपच अस्थिर झाले आहेत. एका दिवसात सोन्याच्या दरात 1 हजार 145, तर चांदीच्या दरात तब्बल 9 हजार 476 रुपयांनी वाढ झाली. गुरुवारी सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 1 लाख 41 हजार 625 रुपये होता, तर चांदीचा दर प्रति किलोस 2 लाख 27 हजार 424 रुपये होता.
सहा महिन्यांत सोन्याचा दर तब्बल 44 हजारांनी, तर चांदीचा दर जवळपास दीडपट म्हणजे 1 लाख 34 हजार रुपयांनी वाढला आहे. 1 जून रोजी सोन्याचा दर 98 हजार 674, तर चांदीचा दर 1 लाख 1 हजार 970 रुपये होता. चांदीच्या दरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्याप्रमाणात दरवाढ झाली आहे. आगामी दराबाबत सांगणे अवघड आहे, असे मत सराफ असोसिएशनचे सचिव सावकार शिराळे यांनी व्यक्त केले.