

Silver Price Crash Today: देशांतर्गत बाजारात आज चांदी आणि सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली. काल बुधवारी सोन्या चांदीच्या भावात जोरदार वाढ झाली होती. पण आज भाव अक्षरशः कोसळले आहेत. चांदीचा भाव काही तासातच 4,000 रुपयांपेक्षा जास्त घसरला, तर सोनेसुद्धा जवळपास ₹1,000 ने खाली आले आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर 5 मार्च एक्स्पायरी असलेल्या चांदीच्या वायदा कराराने आज मोठ्या घसरणीसह व्यापार केला. दुपारी 2.30 वाजेपर्यंत चांदी ₹4,223 किंवा 2.23% घसरून ₹1,78,129 प्रति किलो या स्तरावर ट्रेड करत होती.
IBJA (इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन) नुसार,
बुधवारी चांदीचा भाव: ₹1,78,190 प्रति किलो
गुरुवारी ओपनिंग प्राइस: ₹1,75,713 प्रति किलो
याचा अर्थ, देशांतर्गत बाजारात चांदी ₹2,477 प्रति किलोने स्वस्त झाली. MCX वर चांदी ₹4,000 पेक्षा जास्त आणि देशांतर्गत बाजारात ₹2,477 नी घसरली आहे.
चांदीसोबतच सोनेही घसरले. MCX वर 5 फेब्रुवारी रोजी एक्स्पायरी असलेले सोने ₹835 घसरून ₹1,29,627 प्रति 10 ग्रॅम वर ट्रेड करत होते.
IBJA नुसार,
बुधवारचा भाव: ₹1,28,214 प्रति 10 ग्रॅम
गुरुवारचा भाव: ₹1,27,755 प्रति 10 ग्रॅम
म्हणजेच 24 कॅरेट सोने ₹459 ने स्वस्त झाले. MCX वर सोने जवळपास ₹1,000 आणि IBJA नुसार ₹459 ने घसरले.
घसरणीमागील मुख्य कारणे:
ट्रेडर्सकडून जोरदार प्रॉफिट बुकिंग
आंतरराष्ट्रीय बाजारात भावातील सुधारणा
भारत–अमेरिका ट्रेड डीलवरील सकारात्मक घडामोडींमुळे सुरक्षित गुंतवणूक (gold-safe haven) कमी झाली
डॉलर इंडेक्स आणि बाँड यील्डमधील बदलांचा प्रभाव
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने, सोने–चांदी स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.