

Gold Silver Rate Today:: देशातील सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज 4 डिसेंबरच्या व्यवहारात सोने स्वस्त झाले असून चांदीचे भावही कमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून चांदीत वाढ होत होती, पण आज त्या वाढीला ब्रेक लागला आहे.
सध्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या ताज्या किमती बाजारात अपडेट झाल्या आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मागणी वाढलेली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे भावात घसरण झाली आहे.
24 कॅरेट – ₹1,30,510
22 कॅरेट – ₹1,19,650
18 कॅरेट – ₹97,930
24 कॅरेट – ₹1,30,360
22 कॅरेट – ₹1,19,500
18 कॅरेट – ₹97,780
24 कॅरेट – ₹1,30,360
22 कॅरेट – ₹1,19,500
18 कॅरेट – ₹97,780
जागतिक बाजारातील आर्थिक घडामोडी, युद्धासारखी परिस्थिती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, व्याजदर, आयात शुल्क आणि स्थानिक मागणी या घटकांनुसार सोन्याचे भाव सतत बदलत असतात. तरीही सोन्याला भारतात ‘सेफ हेवन’ गुंतवणूक मानले जाते.
बाजारातील अस्थिरतेत सोनं पोर्टफोलिओला स्थिरता देतं, अशी गुंतवणूकदारांची धारणा आहे. शिवाय भारतात सोने हे फक्त गुंतवणूक नसून सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला धागा आहे.