Stock Market Closing Bell | सेन्सेक्स पहिल्यांदाच ८०,५०० वर बंद, निफ्टी २४,५०० पार, गुंतवणूकदार मालामाल

सेन्सेक्स- निफ्टीचा नवा उच्चांक
Stock Market BSE Sensex
आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ९०० हून अधिक अंकांनी वाढून ८०,८९३ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (दि. १२ जुलै) नवा इतिहास रचला. विशेषतः आयटी शेअर्समधील जोरदार तेजीच्या जोरावर बेंचमार्क निर्देशांक निफ्टी (Nifty 50) आणि सेन्सेक्सने (Sensex) नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ९०० हून अधिक अंकांनी वाढून ८०,८९३ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टीने पहिल्यांदाच २४,५०० चा टप्पा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स ६२२ अंकांच्या वाढीसह ८०,५१९ वर स्थिरावला. तर निफ्टी १८६ अंकांनी वाढून २४,५०२ वर बंद झाला. बाजारातील आजच्या तेजीमुळे गुतवणूकदारांना १.१३ लाख कोटींचा फायदा झाला आहे. (stock market update)

Summary

ठळक मुद्दे

  • आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८०,८९३ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.

  • निफ्टीने पहिल्यांदाच २४,५०० चा टप्पा पार केला.

  • आयटी निर्देशांक ४.५ टक्क्यांनी वाढून बंद.

  • रियल्टी १.५ टक्क्यांनी घसरला.

  • बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप सपाट पातळ‍ीवर बंद.

गुंतवणूदारांनी कमावले १.१३ लाख कोटी

११ एप्रिल रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४,५१,२०,८५३.८९ कोटी रुपये होते. आज शुक्रवारी बाजार भांडवल ४,५२,३४,२१३.९४ कोटी रुपयांवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज १ लाख १३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

क्षेत्रीय आघाडीवर काय स्थिती?

क्षेत्रीय आघाडीवर आयटी निर्देशांक ४.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला. मीडिया निर्देशांकही २ टक्क्यांहून अधिक वाढला. दरम्यान, रियल्टी १.५ टक्क्यांनी घसरला. पॉवर निर्देशांकही सुमारे १ टक्के खाली आला. कॅपिटल गुड्स ०.५ टक्क्यांनी घसरला. ऑटो निर्देशांकातही काही प्रमाणात घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळ‍ीवर बंद झाले.

TCS शेअर्सची घौडदौड अन् गुंतवणुकदारांचा उत्साही मूड

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने जून तिमाहीतील महसुलाच्या अंदाजांना मागे टाकल्यानंतर आयटी शेअर्सनी आज जोरदार उसळी घेतली. यामुळे बाजाराने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. आयटी शेअर्समधील जोरदार तेजीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. तसेच अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा जास्त महागाईमुळे व्याजदर कपातीची आशा निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांचा उत्साही मूड दिसून आला. टीसीएसचा (TCS) एकत्रित निव्वळ नफा वार्षिक ९ टक्क्यांनी वाढून १२,०४० कोटी रुपये झाला. भारतातील या सर्वात मोठ्या IT कंपनीचा एप्रिल-जूनमधील कामकाजातील महसूल ५.४ टक्क्यांनी वाढून ६२,६१३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Stock Market BSE Sensex
अर्थवार्ता

आयटी निर्देशांकाची रॉकेट भरारी

टीसीएसच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांमुळे आयटी निर्देशांक आज जवळपास ५ टक्क्यांनी वाढला. निफ्टी आयटीवर Coforge आणि टीसीएसचे शेअर्स अनुक्रमे ७ आणि ६ टक्क्यांनी वाढून निफ्टीवर टॉप गेनर्स बनले. इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक या शेअर्समध्येही वाढ झाली. दरम्यान, रिअल्टी, हेल्थकेअर आणि फार्मा निर्देशांक सर्वाधिक घसरले. रिअल्टी निर्देशांक १ टक्के घसरला.

Stock Market BSE Sensex
एसआयपीत सतत बदल नुकसानकारक

कोणते शेअर्स सर्वाधिक वाढले?

सेन्सेक्सवर आज टीसीएसचा शेअर्स टॉप गेनर ठरला. हा शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक वाढून ४,२०० जवळ पोहोचला. त्याचबरोबर इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. ॲक्सिस बँक, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्सही वाढले. तर मारुती, एशियन पेंट्स, कोटक बँक, भारती एअरटेल या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

BSE Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्सची स्थिती.BSE

निफ्टीने आज २४,५९२ चा नव्वा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी २४,५०० च्या पातळीवर स्थिरावला. निफ्टीवर टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर मारुती, डिव्हिस लॅब, एशियन पेंट्स, कोल इंडिया हे शेअर्स घसरले.

NSE Nifty 50
निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.NSE
Stock Market BSE Sensex
दक्षता : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी...

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news