Investment Strategy: दरमहा 5,000 रुपये गुंतवले तर 1 कोटी होण्यासाठी किती वेळ लागेल? जाणून घ्या स्मार्ट गुंतवणुकीचं गणित

5000 SIP to 1 Crore Fund: दर महिन्याला फक्त 5,000 रुपये SIP मध्ये गुंतवल्यास साधारण 12% परताव्याने 26–27 वर्षांत 1 कोटी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. यामागे कंपाउंडिंगचा मोठा वाटा आहे.
SIP Investment Strategy
SIP Investment StrategyPudhari
Published on
Updated on

How 5000 SIP Becomes 1 Crore: दर महिन्याला थोडीथोडी बचत करून करोडपती होण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात. पण बहुतांश लोकांना वाटतं की यासाठी मोठ्या पगाराची नोकरी किंवा एकरकमी मोठी गुंतवणूक करावी लागते. प्रत्यक्षात मात्र, योग्य नियोजन आणि संयम असेल तर अगदी दरमहा 5 हजार रुपयांपासूनही 1 कोटींचा फंड तयार करणं शक्य आहे. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला 5,000 रुपये SIP मध्ये गुंतवले आणि त्याला सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा मिळाला. तर अशा परिस्थितीत सुमारे 26 ते 27 वर्षांत त्याचा फंड 1 कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. या काळात त्याची स्वतःची एकूण गुंतवणूक साधारण 15 ते 16 लाख रुपयांपर्यंतच राहते. उरलेली रक्कम ही केवळ कंपाउंडिंगची कमाल असते.

SIP Investment Strategy
Gen Z Debt Trap: 30 हजार पगार… 40 लाखांचं कर्ज! Gen Z कर्जाच्या जाळ्यात कसे अडकत आहेत? कारण काय?

गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या काही वर्षांत वाढ फारशी जाणवत नाही. पण जसजसा काळ पुढे सरकतो, तसतसं रिटर्नवरही रिटर्न मिळू लागतो आणि शेवटच्या काही वर्षांत फंडाची रक्कम झपाट्याने वाढते. म्हणूनच SIP मध्ये सातत्य फार महत्त्वाचं असतं. मध्येच गुंतवणूक थांबवली, तर मोठं उद्दिष्ट गाठणं कठीण होऊ शकतं. शेअर बाजारात चढ-उतार होत राहतात, पण जे गुंतवणूकदार अशा काळातही SIP सुरू ठेवतात, त्यांनाच दीर्घकालीन फायदा होतो.

दरमहा 5 हजार रुपये गुंतवताना संपूर्ण रक्कम एका फंडात टाकण्यापेक्षा ती विभागून गुंतवणं जास्त सुरक्षित मानलं जातं. उदाहरणार्थ, काही रक्कम इंडेक्स फंडात आणि उरलेली फ्लेक्सी कॅप किंवा हायब्रिड फंडात टाकली, तर पोर्टफोलिओमध्ये संतुलन राहू शकतं. यामुळे जोखीम थोडी कमी होते आणि परताव्याची शक्यता वाढते.

तज्ज्ञांचा आणखी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे, दरवर्षी SIP ची रक्कम किमान 10 टक्क्यांनी वाढवत राहणे. पगार वाढला की गुंतवणूकही वाढवली, तर 1 कोटीचं लक्ष्य आणखी लवकर गाठता येऊ शकतं. लाँगटर्मचं उद्दिष्ट असेल तरच इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी, असंही तज्ज्ञ सांगतात.

SIP Investment Strategy
Home Loan EMI: होम लोनचा EMI भरला नाही तर किती दंड लागतो? CIBIL स्कोअरवर काय परिणाम होतो? जाणून घ्या बँकेचा नियम

बाजार घसरला म्हणून SIP बंद करणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. अशा वेळी प्रत्यक्षात कमी किमतीत जास्त युनिट्स मिळतात, ज्याचा फायदा पुढे बाजार सुधारल्यावर होतो. त्याचबरोबर जास्त खर्च (expense ratio) असलेल्या फंडांपासून दूर राहणंही फायदेशीर आहे.

थोडक्यात सांगायचं तर, दरमहा केवळ 5 हजार रुपयांची शिस्तबद्ध गुंतवणूक, त्यात सातत्य, कंपाउंडिंगचा लाभ आणि योग्य फंडांची निवड, या चार गोष्टी केल्या, तर साधारण 26 ते 27 वर्षांत 1 कोटींचा टप्पा गाठणं शक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news