Gen Z Debt Trap: 30 हजार पगार… 40 लाखांचं कर्ज! Gen Z कर्जाच्या जाळ्यात कसे अडकत आहेत? कारण काय?

Gen Z Debt Trap India: कमी पगार असूनही अनेक Gen Z तरुण लाखो रुपयांच्या कर्जात अडकत आहेत. डिजिटल अ‍ॅप्स, क्रेडिट कार्ड आणि BNPL योजनांमुळे सहज कर्ज मिळत असले तरी व्याजदर आणि EMIचा ताण वाढत आहे.
Gen Z Debt Trap
Gen Z Debt TrapPudhari
Published on
Updated on

Gen Z Debt Trap India: पुण्यात राहणारा शुभम जाधव वयाच्या 19 व्या वर्षी फ्रीलान्स फोटोग्राफी करु लागला. सुरुवातीला कॅमेरा आणि इतर उपकरणांसाठी छोट्या रकमेचं त्याने कर्ज घेतलं. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हे कर्ज पुढे जवळपास 40 लाख रुपयांवर जाईल. चार-पाच वर्षांत त्याच्या नावावर तब्बल 54 वेगवेगळी लोन अकाउंट तयार झाली. बहुतांश मोबाईल अ‍ॅप्स, एनबीएफसी आणि क्रेडिट कार्डमधून त्याने लोन घेतलेले. तसेच कोणतेही तारण नसलेले कर्ज त्याने मोठ्या प्रमाणावर घेतले होते.

“2021 नंतर सतत पर्सनल लोनच्या ऑफर्स येऊ लागल्या. कागदपत्र नाहीत, गॅरंटी नाही फक्त एक क्लिक करा आणि पैसे खात्यात. पण EMI चुकू लागल्यावर रोज 15-20 फोन येऊ लागले, घरी एजंट येऊ लागले, नातेवाईकांनाही त्रास होऊ लागला… तेव्हा खरं वास्तव समोर आलं,” असं शुभम सांगतो. शेवटी लोन मॅनेजमेंट संस्थेच्या मदतीने त्याचं कर्ज 40 लाखांवरून जवळपास 5 लाखांपर्यंत आणता आलं. पण शुभम एकटाच नाही.

25 ते 35 वयोगटातील शेकडो तरुण दर महिन्याला कर्ज कमी करण्यासाठी कंपन्यांकडे जात आहेत. अनेक जण तर अजून मदतही मागत नाहीत. पण हळूहळू कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत. 1997 नंतर जन्मलेली ‘जनरेशन Z’ ही पहिली पिढी आहे जिनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं आहे. आधीच्या पिढ्यांसाठी कर्ज म्हणजे शेवटचा पर्याय असायचा; आज मात्र मोबाईलच्या एका क्लिकवर पैसे मिळतात.

आज अशी परिस्थिती आहे की 30–40 हजार रुपयांचा पगार असतानाही काही तरुणांच्या डोक्यावर 30–40 लाखांचं कर्ज आहे. याची सुरुवात घर किंवा गाडीच्या कर्जापासून होत नाही. ती होते छोट्या, असुरक्षित कर्जांपासून मोबाईल, ट्रॅव्हल, लाइफस्टाइल, कोर्सेस, गॅजेट्स. EMI वाढत जातो, पगार कमी पडतो आणि मग एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतलं जातं. हाच खरा ‘डेब्ट ट्रॅप’ आहे.

एका अहवालानुसार नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांपैकी Gen Z चा वाटा 41 टक्के आहे. छोट्या कर्जांमध्ये (50 हजारांखालील) तब्बल 26 टक्के कर्जदार हे असे आहेत ज्यांचे कर्ज 90 दिवसांहून जास्त दिवस थकलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या Financial Stability Report नुसार मायक्रो फायनान्स क्षेत्रातील कर्जांचं प्रमाण अवघ्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

हे सगळं का घडतंय?

सगळ्यात मोठं कारण म्हणजे सहज उपलब्ध होणारं डिजिटल कर्ज. आज क्रेडिट कार्ड, BNPL, UPI क्रेडिट, पगारावर कर्ज, अ‍ॅप लोनचा भडीमार... असं सगळं सुरु आहे. पण या कर्जांवर 18 ते 48 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज लागतं. क्रेडिट कार्डवर फक्त ‘Minimum Due’ भरल्यास महिन्याला 3–4 टक्के व्याज वाढत राहतं.

दुसरं कारण म्हणजे महागाई आणि पगारातील तफावत. खर्च 7–8 टक्क्यांनी वाढतोय, पण पगारवाढ 10 टक्क्यांवरच अडकली आहे. घरभाडं, फुड, सबस्क्रिप्शन, प्रवास... हे सगळंच महाग झालं आहे. महिनाअखेरीस शिल्लक काहीच राहत नाही.

तिसरं कारण म्हणजे सोशल मीडिया आणि पिअर प्रेशर. कोण कुठे फिरायला गेला, कोणता फोन घेतला, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवला. हे सगळं सतत डोळ्यासमोर असतं. ‘YOLO’ (You Only Live Once) मानसिकतेमुळे खर्च वाढतो.

Gen Z Debt Trap
Home Loan EMI: होम लोनचा EMI भरला नाही तर किती दंड लागतो? CIBIL स्कोअरवर काय परिणाम होतो? जाणून घ्या बँकेचा नियम

धोक्याची चिन्हं कोणती?

जर तुम्ही…

  • क्रेडिट कार्डवर फक्त Minimum Due भरत असाल

  • EMI चुकवत असाल

  • एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत असाल

  • पगाराच्या 50% पेक्षा जास्त EMI देत असाल

  • किराणा किंवा भाड्यासाठीही कर्ज वापरत असाल

  • कार्डची 80–90% लिमिट वापरत असाल

…तर समजा तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकणार आहात.

Gen Z Debt Trap
Women Leadership: 79 टक्के महिलांना 'लीडरशीप' पदांमध्ये रस, पण कंपन्यांमध्ये किती संधी दिली जाते? SURVEY तून खुलासा

मग यावर उपाय काय आहेत?

सगळं कर्ज हे वाईट नसतं. घर, शिक्षण, करिअरसाठी घेतलेलं कर्ज उपयोगी असतं. पण छोट्या, महागड्या, असुरक्षित कर्जांपासून शक्यतो दूर राहा.

तज्ञ सांगतात,

  • पगाराच्या जास्तीत जास्त 30 % रक्कमच EMI साठी वापरा.

  • क्रेडिट कार्डचा वापर 30 %च्या मर्यादेत ठेवा.

  • आपत्कालीन निधी तयार ठेवा.

  • एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका.

  • फाजील खर्च कमी करा

  • उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधा.

जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल, तर आर्थिक सल्लागार किंवा कर्ज निवारण संस्थेकडे जा. वेळेत पावलं उचलली तर परिस्थिती सुधारू शकते. आज सहज मिळणारं कर्ज उद्या आयुष्यभराचं ओझं बनू शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news