

Rule Change From 1st May 2026 : एप्रिल महिना संपत असून मे महिन्याची सुरूवात होणार आहे. या नवीन महिन्यात देशात अनेक आर्थिक बदल होणार आहे. यात एलपीजी सिलिंडरचे दर ते एलपीजी वितरण व्यवस्थेतील बदलांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या क्रेडिट कार्ड युजर्ससाठी देखील मोठे बदल केले आहे. चला तर मग देशात १ मे २०२६ पासून देशात काय काय बदल होणार हे जाणून घेऊयात.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑईल मार्केटमधील कंपन्या आपल्या एलपीजी सिलेंडर दराच्या किंमतीत करेक्शन करत असतात. त्याचबरोबर नवीन दर आणि नियम देखील लागू करतात. याचा प्रभाव आपल्या थेट किचन बजेटवर पडतो. तसेच रेस्तराँ आणि हॉटेल यांच्यावर देखील याचा प्रभाव पडतो. गेल्या महिन्यात १४ किलो घरगुती वापराच्या आणि १९ किलो व्यावसायिक वापराच्या गँस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. आता मे महिन्यात देखील याच्यात बदल होण्याची शक्यता आहे.
OMCs हे एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी सिस्टमबाबत देखील चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपन्या सिलेंडर बुकिंग आणि लॉक इन कालावधीमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे. OTP बेस्ड डिलिव्हरी सिस्टम कायमस्वरूपी लागू करण्यावर देखील निर्णय येऊ शकतो.
१ मे २०२६ पासून एलपीजी सिलेंडरच्या दरातील बदलासोबतच तेल कंपन्या हवाई इंधन (ATF प्राईस) किंमतीत देखील बदल करतात. एप्रिल महिन्यात याचे दर दुप्पट झाले होते. मात्र नंतर ही भाववाढ मागे घेण्यात आली होती. याच जोडीला सीएनजी आणि पीएनजी गॅस दरात देखील बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट प्रभाव तुमच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे.
१ मे २०२६ पासून क्रेडिट कार्ड युजर्सना देखील काही बदल दिसतील. एसबीआय कार्डने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार लेट पेमेंट चार्जेस पासून वार्षिक फीपर्यंत अनेक बदल होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून १०० पेक्षा जास्त आणि ५०० रूपयांपर्यंतच्या थकबाकीवर लेट पेमेंट चार्जेस १०० रूपये लागू होणार आहेत. त्याचबरोबर ५०० रूपयांपेक्षा जास्त आणि १००० रूपयांपर्यंत थकबाकीवर ५०० रूपये टॅक्स द्यावा लागणार आहे. तसेच BPCL SBI Credit Card साठी लागू ४९९ ची वार्षिक फी आता वर्षाला १ लाख रूपये खर्च केल्यानंतर परत मिळणार आहे. सध्या हा कॅप ५०,००० रूपये आहे.
१ मे पासून 'ऑनलाइन गेमिंग नियम २०२६' (Online Gaming Rules 2026) लागू होत असून या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया (OGAI) ची स्थापना केली जाईल. या बदलांतर्गत ऑनलाइन गेम्सचे Online Money Games, Online Social Games आणि E-Sports अशा तीन भागांत वर्गीकरण करण्यात येईल.
ज्या प्लॅटफॉर्मवर पैशांशी संबंधित गेम खेळले जातात, त्यांना आता नोंदणी (Registration) करणे बंधनकारक असेल. सरकार अशा प्लॅटफॉर्मवरील युजर्सच्या आर्थिक व्यवहारांवर (Financial transactions) विशेष लक्ष ठेवणार आहे.
मे महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असल्याने, कोणतेही काम करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेची (RBI) सुट्ट्यांची यादी तपासून पाहणे आवश्यक आहे. दुसऱ्या व चौथ्या शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र दिन/कामगार दिन, रवींद्रनाथ टागोर जयंती आणि ईद-उल-अधा (Eid Ul Adha) यांसारख्या विविध सणांनिमित्त बँका बंद राहतील.
या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार बदलू शकतात, मात्र या काळात ऑनलाइन बँकिंग (Online Banking) सेवा सुरू राहतील, ज्याचा वापर ग्राहक आपली कामे पूर्ण करण्यासाठी करू शकतात.