RBI New Rules: 1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंटमध्ये मोठा बदल; RBIने लागू केले नवे नियम, कोणते बदल होणार?

RBI New Rules from April 1: 1 एप्रिलपासून RBI ने डिजिटल पेमेंट्ससाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) अनिवार्य केले आहे. आता केवळ OTP पुरेसा नसून PIN किंवा बायोमेट्रिकसारखी अतिरिक्त पडताळणी आवश्यक असेल.
RBI New Rules from April 1
RBI New Rules from April 1Pudhari
Published on
Updated on

RBI New Rules from April 1: 1 एप्रिल 2026 पासून भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. Reserve Bank of India (RBI) ने ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांचा परिणाम UPI, कार्ड पेमेंट्स आणि डिजिटल वॉलेट वापरणाऱ्यांवर होणार आहे.

या नव्या नियमांनुसार, आता प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, केवळ OTP टाकून व्यवहार पूर्ण होणार नाही. प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर पडताळणी करावी लागणार आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर आता OTP हा फक्त पहिला टप्पा असेल. त्यानंतर PIN, पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा बायोमेट्रिक यापैकी कोणत्यातरी दुसऱ्या माध्यमातून पडताळणी करावी लागेल. यामुळे ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.

RBI ने हा निर्णय का घेतला, यामागेही ठोस कारण आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. फिशिंग, SIM स्वॅप आणि OTP फ्रॉडसारख्या प्रकारांमुळे अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ OTP वर आधारित प्रणाली असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या नव्या नियमांमुळे व्यवहाराची प्रक्रिया थोडी अधिक वेळ घेणारी आहे. पण त्याचवेळी सुरक्षितता वाढणार आहे. नियमित युजर्सना त्यांच्या ओळखीच्या डिव्हाइसवर व्यवहार करताना फारसा फरक जाणवणार नाही. मात्र नवीन डिव्हाइस किंवा मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी करावी लागू शकते.

या नियमांमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे बँकांची जबाबदारी वाढवण्यात आली आहे. जर एखादी फसवणूक बँक किंवा पेमेंट सिस्टीमच्या त्रुटीमुळे झाली, तर संबंधित संस्थेला ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागू शकते. त्यामुळे बँका आणि पेमेंट कंपन्यांवर अधिक जबाबदारी येणार आहे.

RBI New Rules from April 1
Bowling Action: मैदानावर वादाची ठिणगी! KKR च्या खेळाडूवर 'नक्कल' केल्याचा गंभीर आरोप; चाहत्यांमध्ये संताप

आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरही हेच नियम लागू होणार आहेत. परदेशी कार्ड पेमेंट्ससाठीही अशाच प्रकारची सुरक्षा पद्धत लागू केली जाणार असून, ऑक्टोबर 2026 पर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी अपेक्षित आहे.

भारतामध्ये डिजिटल पेमेंट्सचा वेगाने विस्तार होत असताना, त्याच वेगाने सायबर गुन्हेही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर RBI चे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. काहींना हे नियम सुरुवातीला त्रासदायक वाटू शकतात, पण ते सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.

RBI New Rules from April 1
iPhone Price: भारतामध्ये iPhone 5,000 रुपयांनी महागणार; जुन्या मॉडेल्सच्या किंमतीही वाढणार, ग्राहकांना बसणार फटका

एकूणच, 1 एप्रिलपासून डिजिटल व्यवहार करताना फक्त “एक OTP पुरेसा नाही” हे लक्षात ठेवावं लागणार आहे. आता प्रत्येक पेमेंटसाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) सुरक्षा अनिवार्य असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news