Loan Against Mutual Funds | म्युच्युअल फंडावर कर्ज कसे मिळते?

म्युच्युअल फंडावर किती कर्ज मिळेल? जाणून घ्या अधिक
Loan Against Mutual Funds
म्युच्युअल फंडावर कर्जPudhari File Photo
Published on
Updated on
अनिल पाटील, प्रवर्तक : एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

म्युच्युअल फंडावर ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन प्रकारे कर्ज मिळू शकते. बँका शक्यतो ऑफलाईन कर्ज देतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक स्टेटमेंट घेऊन संबंधित कर्जाच्या अर्जावर सह्या घेऊन म्युच्युअल फंड कंपन्यांना गुंतवणुकीवर बोजा नोंद करण्याबाबत कळवितात व युनिटवर तारण नोंद करतात. मग, गुंतवणुकीवर बँकेचा बोजा चढवला जातो आणि कर्ज मंजूर केले जाते.

Loan Against Mutual Funds
दक्षता : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी...

प्रत्येकाचे आयुष्य हे अनपेक्षित घटनांनी भरलेले आहे. जीवनात अशा काही घटना घडतात की, अचानक तुमच्या समोर पैशाचे संकट उभे राहते. चांगल्या किंवा वाईट घटनेसाठी मोठा पैसा मोजावा लागतो. उदा. कुटुंबातील सदस्यांचे अपघात, मोठे आजारपण, धार्मिक कार्य, घराची पडझड, वाहन दुरुस्ती, जागा खरेदी, सोने खरेदी, नातेवाईकांना मदत, कुटुंबातील लग्न, मुलांचे शिक्षण, नैसर्गिक आपत्ती असे अनेक प्रसंग पूर्वसूचना न देता येतात. त्यावर मात करण्यासाठी पैशाच्या मोठ्या तरतुदीची गरज भासते. ही गरज पूर्ण करताना सर्वप्रथम आपण आपल्या जवळची रोख रक्कम खर्च करतो. मग, मित्रांकडून उसने घेतो, पर्सनल लोन घेतो, बँकेच्या मुदत ठेवीवर किंवा सोने तारण ठेवून कर्ज घेतो किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेतो. मुळात आपल्या कुटुंबाचे आपत्ती व्यवस्थापन आणि जोखीम व्यवस्थापन करणे या दोन गोष्टीला आर्थिक नियोजनामध्ये अन्यन्य महत्त्व आहे. याचे काटेकोर नियोजन केले पाहिजे. अनपेक्षित घटनांवर मात करण्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढण्याऐवजी त्यावर कर्ज काढून ही गरज भागवता येते आणि हे फार फायदेशीर ठरते. कसे ते आपण पाहू!

Loan Against Mutual Funds
म्युच्युअल फंड आणि वारसदार

मध्यम ते दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्णत्वासाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे खूपच फायदेशीर ठरते. इक्विटी म्युच्युअल फंडात दरमहा सातत्याने गुंतवणूक केली, तर मोठी संपत्ती निर्माण करता येते. ही गुंतवणूक करताना आपल्याला अचानक पैशाची गरज भासली, तर त्यावर कर्ज घ्यावे. गुंतवणूक काढून घेण्याची चूक करू नका. कारण, यातून मिळणार्‍या चक्रवाढ व्याजाची ताकद ही दीर्घकालामध्ये मोठी संपत्ती निर्माण करते; मात्र गुंतवणूक काढून घेतली, तर मोठी संपत्ती निर्माण करण्याचे स्वप्न भंग पावते. संपत्ती निर्मितीची प्रक्रिया बंद पडते. याची योग्य माहिती हवी.

एक उदाहरण पाहू. माझे एक मित्र संकेत आज वय 45 वर्षे आहे. ते वयाच्या 35 वर्षांपासून म्हणजेच 2015 पासून आपल्या रिटायरमेंटसाठी दर महिन्याला 50 हजागर रुपयांची एसआयपी इक्विटी फंडात गुंतवणूक करीत आहेत. सध्या त्यांची एकूण गुंतवणूक 54 लाखांची असून त्याचे बाजारमूल्य 108 लाख रुपये इतके झाले आहे. संकेतने रिटायरमेंटसाठी वयाच्या 55 व्या वर्षी 6 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे; पण सध्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे गंभीर आजाराचे निदान झाले असून, त्यांना उपचारासाठी 25 ते 30 लाखांची गरज आहे. या खर्चाच्या तरतुदीसाठी पैसे म्युच्युअल फंडातून उपलब्ध करावेत म्हणून ते आपली गुंतवणूक काढण्यासाठी आले असता त्यांना या गुंतवणुकीवर कर्ज काढून पैसे उपलब्ध करून दिले. कारण, आता 30 लाख रुपये काढून दिले, तर चक्रवाढ व्याजाच्या परिणामाने येणार्‍या 11 वर्षांतील त्यांचे 1 कोटी 39 लाखांचे नुकसान झाले असते. ही गोष्ट त्यांना समजावून सांगून म्युच्युअल फंडावर त्वरित कर्ज मिळवून दिले. या कर्जावर दर महिन्याला फक्त व्याज भरत राहिले, तरी चालते. जेव्हा-जेव्हा पैसे येतील तेव्हा तेव्हा त्यांना कर्जाची रक्कम भरता येते. या निर्णयाने संकेत यांना निरंतर गुंतवणूक करून त्यांना त्यांचे दीर्घकाळातील वृद्धापकाळाचे उद्दिष्ट कमी गुंतवणुकीमध्ये साध्य करत मोठी संपत्ती निर्माण करण्याचे कार्य सहजपणे साध्य होणार आहे.

Loan Against Mutual Funds
ओव्हरनाईट फंड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी लाभदायी पर्याय

कर्ज कोणाला, कसे मिळते?

म्युच्युअल फंड मालमत्तेवरील तारण कर्जास (Loans against security) LAS म्हणतात. वैयक्तिक गुंतवणूकदार, एनआरआय, व्यवसायधारक, हिंदू अविभक्त कुटुंबप्रमुख (HUF), ट्रस्ट, कॉर्पोरेशन कंपन्या आणि इतर संस्थांसाठी कर्जाची ही सुविधा उपलब्ध आहे; परंतु अल्पवयीन गुंतवणूकदारांना हे कर्ज मिळू शकत नाही. इथे तुमचा सिबिल स्कोर चांगला पाहिजेच असे नाही. कमी स्कोर असला, तरी तुम्हाला कर्ज मिळू शकते.

म्युच्युअल फंडावर ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन प्रकारे कर्ज मिळू शकते. बँका शक्यतो ऑफलाईन कर्ज देतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक स्टेटमेंट घेऊन संबंधित कर्जाचा अर्जावर सह्या घेऊन म्युच्युअल फंड कंपन्यांना गुंतवणुकीवर बोजा नोंद करणे बाबत कळवितात. युनिटवर तारण नोंद करतात. गुंतवणुकीवर बँकेचा बोजा चढवला जातो आणि कर्ज मंजूर केले जाते. मग, कर्जाची रक्कम बचत खात्यामध्ये वर्ग केली जाते. या सर्व प्रक्रियेला किमान सहा ते आठ दिवस लागतात.

Loan Against Mutual Funds
म्युच्युअल फंड आणि वारसदार

नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या ऑनलाईन कर्जाची प्रोसेस करून अवघ्या पंधरा मिनिटांत तुम्हाला कर्ज देतात. म्युच्युअल फंडावर ऑनलाईन लोन घेणे हा इन्व्हेस्टरसाठी एक स्मार्ट पर्याय ठरू शकतो. या फायनान्स कंपन्यांनी स्वतःचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून, त्याद्वारे त्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये गुंतवणूकदारांचा पॅन कार्ड क्रमांक टाकला की ओटीपी मान्यता घेऊन त्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक किती आहे आणि याला कर्ज किती मिळते, हे त्यांना कळते.

रजिस्टर मेल आयडी आणि मोबाईलवर ओटीपीच्या साह्याने मान्यता घेऊन व इतर माहिती घेऊन सदरचे कर्ज अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये युनिट लीन मार्किंग होऊन तुम्हाला कर्ज मंजूर होते. ही रक्कम रिडिमेशन केली की, त्वरित तुमच्या बचत खात्यामध्ये पैसे जमा होतात. समजा दहा लाख रुपये मंजूर झाले असतील आणि तुम्हाला फक्त दोनच लाख रुपये हवे असतील, तर तितकीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करून घेऊ शकता आणि जेवढी कर्जाची उचल केली आहे, तेवढ्याच रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते; मात्र उचललेल्या कर्जाच्या रकमेवरील दरमहा होणारी व्याजाची रक्कम ही तुमच्या बचत खात्यामधून ऑटो डेबिट केली जाते. तुम्हाला पैसे भरायला कुठेही जाण्याची गरज भासत नाही. अजून कर्ज हवे असेल किंवा कर्जाची रक्कम भरायची असेल, तर सर्व व्यवहार मोबाईल अ‍ॅप्लिकेशन मधून होतात. अशी सहजपणे त्वरित कर्जाची प्रक्रिया पूर्ण होते.

image-fallback
म्युच्युअल फंड : गुंतवणुकीचे उत्कृष्ट साधन

काही महत्त्वाच्या गोष्टी

या प्रकारचे कर्ज (CASH CREDIT) ओव्हरड्राफ्ट सुविधेसारखे काम करते. ज्यामुळे तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा पैसे काढण्यास आणि परतफेड करण्यास मदत होते, अतिरिक्त शुल्काशिवाय. व्याज हे पूर्णपणे तुम्ही उचललेल्या कर्ज रकमेवर आकारले जाते आणि केवळ तुम्ही त्याचा वापर करत असलेल्या कालावधीसाठीच आकारले जाते. तुम्हाला आर्थिक अडचणींमध्ये तुमची गुंतवणूक काढण्यापेक्षा कर्ज काढून एक प्रकारे खेळते भांडवल म्हणून वापरू शकता. दीर्घकाळात बाजाराप्रमाणे तुमचे गुंतवणुकीचे मूल्य वाढत जाते. समजा तुम्ही गुंतवणुकीवर कर्ज काढले आहे आणि काही कारणांनी मार्केट कोसळले, तर तुम्हाला मार्जीन कमी पडले, तर पैसे भरावे लागतात आणि वाढलेल्या मार्केटनुसार गुंतवणूकमूल्य वाढते. या पद्धतीने तुम्हाला कर्जाची रक्कमसुद्धा वाढून मिळू शकते. कर्जाचा काही भाग परतफेड केल्यास तुम्हाला त्याच प्रमाणात म्युच्युअल फंड युनिटस् परत मिळू शकतात. इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर वर्षानुवर्षे लाभांश मिळणे आणि संपत्तीमध्ये वाढ होणे हे सुरूच राहते; परंतु जे युनिटस् तुम्ही कर्जासाठी बँक/वित्तीय संस्थेकडे तारण ठेवता, ते युनिटस् तुम्हाला विकता येत नाहीत.

image-fallback
अर्थवार्ता : म्युच्युअल फंड | पुढारी

व्यवसायधारकांनाही फायदेशीर

बरेच व्यवसायधारक आपली रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरूपात गुंतवणूक करतात. खेळत्या भांडवलासाठी त्यावर कॅश क्रेडिट घेतात. त्यावर बँकेत 7 ते 8 टक्के व्याज मिळते. त्यामधून आयकर वजा केला असता निव्वळ परतावा म्हणून 5 टक्क्यांपर्यंत व्याज पदरात पडते. अशी ठेव रक्कम 14 वर्षांत दुप्पट होते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून त्यावर कर्ज घेतले तर खेळते भांडवल म्हणून निधी उपलब्ध होईल आणि आपल्या दीर्घकाळात गुंतवणुकीवर 12 ते 15 टक्के परतावा मिळून 14 वर्षांत चार-पाच पटीने पैसा वाढेल आणि भविष्यात मोठी संपत्तीही निर्माण होईल. व्यवसायधारकांना ही गोष्ट फायदेशीर पडते.

किती कर्ज मिळेल?

म्युच्युअल फंडामध्ये मुख्यतः दोन प्रकारच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली जाते. ऋण बाजार (DEBT Market) म्हणजे सुरक्षित गुंतवणूक आणि समभाग (Equity Market) जोखीमयुक्त गुंतवणूक होय. डेब्ट मार्केटमध्ये सुरक्षित गुंतवणूक असते. या ठिकाणच्या गुंतवणुकीवर 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते; मात्र इक्विटी म्युच्युअल फंडाच्या बाबतीत बाजार जोखीम असते म्हणून एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत आजचे बाजारमूल्य जितके असेल त्याच्या 45 ते 50 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध होते.

image-fallback
म्युच्युअल फंडामध्ये असेट अलोकेशनचे महत्त्व

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news