

Stock Market Today: डिसेंबर सीरीजच्या दमदार सुरुवातीसोबतच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. निफ्टीने बाजार उघडताच नव्या उच्चांकाच्या दिशेने झेप घेत 25,295 चा रेकॉर्ड केला. बँक निफ्टीनेही ओपनिंगमध्येच 59,605 चा सर्वकालीन उच्चांक गाठला. सेंसेक्स 136 अंकांनी वाढून 85,745 वर उघडला. तर निफ्टी 56 अंकांच्या वाढीसह 26,261 वर ट्रेडिंग करत आहे.
कंज्यूमर ड्युरेबल्स आणि ऑइल-गॅस इंडेक्समध्ये घसरण झाली, तर बाकी सर्व सेक्टर्समध्ये तेजी होती. निफ्टी 50 मध्ये Bajaj Finance, Shriram Finance, Bajaj Auto, Hindalco, ICICI Bank हे टॉप गेनर्स ठरले. तर Eternal, HDFC Life, Eicher Motors, ONGC, Ultratech Cement हे टॉप लूझर्स राहिले.
बाजार सुरू होण्यापूर्वीच जागतिक बाजारांत मजबूत तेजी दिसत होती. अमेरिकन मार्केट्समध्ये सलग चौथ्या दिवशी खरेदी झाली—Dow Jones 300 अंकांनी वाढला, Nasdaq 200 अंकांनी वाढला आणि S&P 500मध्येही दमदार वाढ दिसली. थँक्सगिव्हिंग डे मुळे आज अमेरिकन बाजार बंद राहणार आहेत, तर Dow Futures किंचित घसरणीसह ट्रेड करताना दिसत आहेत.
डिसेंबर सीरीजच्या पहिल्याच दिवशी FIIs ने कॅश मार्केटमध्ये तब्बल ₹4,800 कोटींची नेट खरेदी केली. डेरिव्हेटिव्हसह एकूण पोझिशन ₹7,347 कोटींवर गेली. देशांतर्गत फंड्स (DIIs) नेही सलग 63व्या ट्रेडिंग दिवशी खरेदी सुरू ठेवत ₹6,248 कोटींची गुंतवणूक केली. मोठ्या आणि जास्त लिक्विड स्टॉक्समध्ये सतत पैसा येत असल्याने बाजाराला आधार मिळाला.
चांदी ₹5,150 ने वाढून ₹1,61,300 च्या वर
सोने ₹800 वाढून ₹1,26,000 जवळ
इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांदी 4% आणि सोने $20 ने वाढले
क्रूड ऑइल 1% वाढीसह $62 च्या वर
डॉलर इंडेक्स सलग दुसऱ्या दिवशी 100 च्या खाली
US बॉण्ड यील्ड पाचव्या दिवशी 4% खाली
- Rare Earth Magnets साठी ₹7,280 कोटींची PLI मंजूर
या स्कीममुळे डिफेन्स, EV आणि एरोस्पेस क्षेत्रांना मोठा लाभ होण्याची शक्यता. GMDC, Sona Comstar, Bharat Forge, JSW यांना फायदा होण्याची शक्यता.
- रेल्वे स्टॉक्सला बूस्ट
पुणे मेट्रो विस्तार प्रकल्पाला ₹9,860 कोटींची मंजूरी; महाराष्ट्र-गुजरातसाठी ₹2,800 कोटींचे नवे रेल्वे प्रकल्प.
- Paytm Payments Services ला RBI चा Payment Aggregator परवाना
कंपनीसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे.
- Whirlpool मध्ये ₹965 कोटींच्या ब्लॉक डीलची शक्यता
Mauritius युनिट 7.5% हिस्सा विकू शकते.
-Auto Sector Alert
M&M ने BE6 Formula E Edition लाँच केला. आज पहिली 7-Seater Electric SUV XEV 9s लाँच होणार. EV थीममुळे स्टॉक्सवर फोकस वाढेल.