India Retail inflation: महागाई आटोक्यातच, सुधारित आधारभूत वर्षाचा पहिला अहवाल सादर

महागाई निर्देशांक काढण्यासाठी कालबाह्य आधारभूत वर्षाचा आधार घेत असल्याची टीका होत होती.
India Market
India MarketPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली: सुधारीत आधारभूत वर्षाच्या आधारे काढलेला पहिला ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) गुरुवारी (दि.१२) जाहीर झाला. त्यानुसार जानेवारी महिन्यातील महागाई निर्देशांक २.७५ टक्के आहे. शहरी भागातील महागाई निर्देशांक २.७७ आणि ग्रामीण भागातील २.७३ टक्के आहे.

India Market
Retail Inflation | सर्वसामान्यांना दिलासा! किरकोळ महागाई दर ६ वर्षांच्या निचांकी पातळीवर, 'या' वस्तू झाल्या स्वस्त

डिसेंबर २०२५ पर्यंत २०१२च्या आधारभूत वर्षावर महागाई निर्देशांक काढला जात होता. डिसेंबरमध्ये निर्देशांक १.३३ टक्क्यांवर होता. महागाई निर्देशांक काढण्यासाठी कालबाह्य आधारभूत वर्षाचा आधार घेत असल्याची टीका होत होती. नामांकित आंतरराष्ट्रीय संघटनांनी देखील यावर भाष्य केले होते. अखेरीस २०२४च्या आधारभूत वर्षानुसार महागाई निर्देशांक काढण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार गुरुवारी पहिला अहवाल सरकारने जाहीर केला. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार (आरबीआय) महागाईची सहनशील पातळी चार ते सहा टक्के आहे.

India Market
Cosmetics Retailers : सौंदर्य प्रसाधनांच्या किरकोळ विक्रेत्यांचीही होणार नोंदणी

आरबीआयच्या न्यूनतम चार टक्के पातळीपेक्षा जानेवारीतील महागाई निर्देशांक खाली राहिला आहे. तर, सलग बारा महिने महागाई निर्देशांक दोन ते सहा टक्के पातळीवर राहिला आहे. शीतपेय वगळता खाद्यान्नाच्या किमतीचा एकूण महागाई निर्देशांकातील वाटा ३४.७७ टक्के आहे. त्यानुसार अन्नधान्याच्या किमती (पेय वगळून) २.१३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

India Market
RBI Retail Direct Scheme : ही योजना आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

ग्रामीण आणि शहरी भागांसाठी हा दर अनुक्रमे १.९६ आणि २.४४ टक्के आहे. पेय धरून महागाई निर्देशांकातील खाद्यपदार्थांचा वाटा ३६.७५ टक्के आहे. पूर्वीच्या पद्धतीनुसार सीपीआयमध्ये अन्न आणि पेयांचा एकत्रित वाटा ४५.९ टक्के होता. एकूण निर्देशांकाच्या जवळपास निम्मा वाटा खाद्यान्न आणि पेयांचा होता. .

India Market
Retail vegetable scam : खराब भाजीपाला ग्राहकांच्या माथी, किरकोळीत लूट सुरूच

घरांच्या महागाईतही बदल...

नवीन पद्धतीनुसार गृहनिर्माण महागाई दर २.०५ टक्क्यांवर आला आहे. त्यात ग्रामीण आणि शहरी भागांचा दर अनुक्रमे २.३९ आणि १.९२ टक्क्यांनी वाढला आहे. जुन्या पद्धतीनुसार डिसेंबरमध्ये गृहनिर्माण क्षेत्राची महागाई २.८६ टक्क्यांवर होती.

India Market
Retail Market : रिटेल क्षेत्रात १.२५ लाख कोटींहून अधिकची विक्री

म्हणून केला बदल..

महागाई निर्देशांक काढण्यासाठी २०१२चा आधार घेतला जात होता. आता आधारभूत वर्ष २०२४ धरल्याने दरम्यानच्या काळात घरगुती खर्चाच्या पद्धतीमध्ये झालेल्या बदलाचे प्रतिबिंब अधिक अचूक पडणार आहे. अर्थव्यवस्थेतील किमतींचा कल कसा आहे, याचे देखील अचूक मापन नवीन पद्धतीत होईल. त्यासाठीच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने हा बदल केला आहे.

India Market
Retail Digital Rupee मुंबईसह ४ शहरांत १ डिसेंबरपासून डिजिटल रुपायाची चाचणी

जीडीपीचे आधारभूत वर्ष बदलणार

सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) दोन्हींसाठी आधारभूत वर्ष २०२२-२३ पर्यंत अद्ययावत करण्याचा प्रस्ताव आहे.

India Market
Retail Shopkeepers : रिटेल दुकानदारांना स्वस्तात कर्ज, विमा संरक्षणही

महागाई निर्देशांकात असा असेल वाटा ( कंसात जुना टक्का)

खाद्यान्न आणि पेय ३६.८ (४५.९), मादक पदार्थ ३ (२.४), कपडे-पादत्राणे ६.४ (६.५), घर, पाणी, वीज, गॅस आणि इतर इंधन १७.७ (१६.९), फर्निचर, घरगुती वापराची उपकरणे, घराच्या स्वच्छतेसाठीची संसाधने ४.५ (३.८), आरोग्य ६.१ (५.९), वाहतूक ८.८ (६.४), माहिती आणि संवाद ३.६ (२.२), मनोरंजन, क्रीडा, संस्कृती १.५ (१.७), शैक्षणिक सेवा ३.३ (४.५), हॉटेल ३.३ (०.०१), वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षा, इतर वस्तू आणि सेवा ५ (३.९), मुख्य सीपीआय (खाद्यान्न-पेय, इंधन वगळून) ५७.९ (४७.३)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news