Retail vegetable scam : खराब भाजीपाला ग्राहकांच्या माथी, किरकोळीत लूट सुरूच

पावसामुळे 40 टक्के आवक घटली, घाऊक बाजारातील दर मात्र स्थिर
Retail vegetable scam
नवी मुंबई : पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने फेकून द्यावा लागला. त्यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान झाले. (छाया : सुमीत रेणोसे)
Published on
Updated on

नवी मुंबई : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे एपीएसीच्या भाजीपाला बाजारात काही प्रमाणात खराब भाजीपाला आवक होत आहे. मात्र किरकोळ बाजारात हाच भाजीपाला 100 ते 120 रुपये किलोने तर पालेभाज्या 40 ते 50 रुपये जुडीने ग्राहकांच्या माथी मारून त्यांची लूट सुरू आहे.

एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात नियमीत साडे सहाशे गाडी भाजीपाला आवक होते. मंगळवारी वाशीतील एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात 490 गाड्यांची आवक झाली. यामध्ये लहान वाहनांचा समावेश अधिक असल्याने सरासरी आवक 350 गाड्यांचीच होती. ही आवक नियमीत आवकच्या तुलतेन 40 टक्के कमी होती.

विशेष म्हणजे यातील 70 टक्के शेतमाल मध्यम दर्जाचा असून जो भिजलेला व खराब होता. फक्त 30 टक्के उत्तम प्रतीचा शेतमाल आवक आहे. त्यामुळे एपीएमसीत घाऊक दर हे स्थीर आहेत. मात्र, हाच भिजलेला भाजीपाला किरकोळ व्यापरी ग्राहकांच्या माथी मारत असून तो 100 ते 120 रुपये किलोच्या दराने विकत आहेत.

मंगळवारी भाजीपाला उत्पादन घेणार्‍या जिल्ह्यांना फटका बसला. काढणीवर आलेला शेतमाल टोमॅटो, ढोबल मिरची, फ्लोअर, कोबी, गवार, कारली, दुधी भोपळा, शिराळासह इतर सर्व भाजीपाला आवक बाजारात होत आहे. पावसाने भाजीपाला खराब झाल्याने फेकून द्यावा लागल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले.

भाजीपाल्याचे दर

  • भाजीपाला

घाऊक : 40 ते 60 रुपये

किरकोळ : 100 ते 120

  • पालेभाज्या

घाऊक : 6 ते 18 रुपये जुडी

किरकोळ : 35 ते 40 रुपये जुडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news