India Automobile Export: वाहन निर्यातीने घेतली मोठी झेप; १० महिन्यांत ५३.९५ लाख वाहनांची विदेशात पाठवणी

तीनचाकी निर्यातीत ५२% वाढ; देशांतर्गत विक्री २.२२ कोटींवर, उत्पादनातही लक्षणीय वाढ
India Automobile Export
India Automobile ExportPudhari
Published on
Updated on

पुणे : चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यात वाहन निर्यात २४.४ टक्क्यांनी वाढून ५३ लाख ९५ हजारांवर गेली आहे. तीनचाकी वाहनांची निर्यात ५२ टक्क्यांनी वाढली असून, चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या निर्यातीत अनुक्रमे १७.६ आणि २३.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ४३.३५ लाख वाहनांची निर्यात झाली होती.

India Automobile Export
Stock Market Today: सेन्सेक्स–निफ्टीत मोठी घसरण; IT शेअर्स कोसळले, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

चालू आर्थिक वर्षात सर्वच श्रेणीतील वाहन निर्यातीत वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीनंतर वाढीची गती वाढली आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीत कारची निर्यात ३.३८ वरून ३.७६ लाखांवर गेली असून, यूव्ही कारची निर्यात २.८९ वरून ३.६२ लाखांवर गेली आहे. व्हॅनची निर्यात ७,५०९ वरून ८,७३६वर गेली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्टरर्स (सियाम)ने ही आकडेवारी शुक्रवारी (दि.१३) जाहीर केली.

India Automobile Export
India Retail inflation: महागाई आटोक्यातच, सुधारित आधारभूत वर्षाचा पहिला अहवाल सादर

प्रवासी तीनचाकी वाहनांची निर्यात २.४८ वरून ३.७९ लाखांवर झेपावली आहे. तब्बल ५२.४ टक्क्यांनी निर्यात वाढली आहे. तर, मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांची निर्यात ३,१२९ वरून ४,४४०वर गेली आहे. एकूण तीनचाकी वाहनांची निर्यात २.५१ वरून ३.८३ लाखांवर गेली आहे. दुचाकींची निर्यात ३४.४२ वरून ४२.५९ लाखांवर गेली आहे. दुचाकींच्या निर्यातीत एकूण २३.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. स्कूटर्सची निर्यात ४.९० वरून ५.५९ लाखांवर गेली असून, मोपेडची निर्यात ५,५७४ वरून १७,८६२वर गेली आहे. तर, मोटरसायकलची निर्यात २९.४६ वरून ३६.८२ लाखांवर गेली आहे. मोटरसायकलची निर्यात २५ टक्क्यांनी वाढली आहे.

India Automobile Export
AI.com Domain: १० वर्षाचा मुलगा.. ३०० रूपयांचा डोमेन अन् एका रात्रीत कमवले तब्बल ६०० कोटी रूपये

अशी आहे देशांतर्गत विक्री...

एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यात चारचाकी वाहनांची विक्री ३४.९० वरून ३७.०६ लाखांवर गेली आहे. त्यात युटिलिटी व्हेईकलचा (यूव्ही) वाटा २४.५२ लाख आहे. चीनचाकी वाहनांची विक्री ६.२० वरून ६.८५ लाखांवर गेली आहे. त्यात प्रवासी तीनचाकींचा वाटा ५.६७ लाख आहे. दुचाकींची विक्री १.६५ वरून १.७८ कोटींवर गेली आहे. त्यात मोटरसायकलचटा वाटा १ कोटी ७ लाख आहे. खालोखाल ६६.२६ लाख स्कूटर्सची विक्री झाली आहे.

India Automobile Export
Stock Market Today: आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री; निफ्टी 120 अंकांनी खाली, मिड-स्मॉलकॅपमध्येही घसरण

असे झाले उत्पादन...

एप्रिल ते जानेवारी या कालावधीत वाहनांचे उत्पादन २.५० वरून २.७४ कोटींवर गेले आहे. चारचाकी वाहनांचे उत्पादन ४०.८२ वरून ४४.२५ लाखांवर गेले आहे. त्यात यूव्ही वाहनांचा वाटा तब्बल २७.९८ लाख आहे. चीनचाकी वाहनांचे उत्पादन ८.७९ वरून १०.७५ लाखांवर गेले आहे. त्यात प्रवासी तीन चाकींचा वाटा ९.५३ लाख आहे. दुचाकींचे उत्पादन दोन कोटींवरून २.१९ कोटींवर वाढले आहे. त्यात मोटरसायकलचा वाटा तब्बल १.४४ कोटी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news