LPG cylinder: नो बुकिंग, नो वेटिंग! इंडेनने लॉन्च केला ‘छोटू’ LPG सिलेंडर; किराणा दुकानातही मिळणार

Indane Chotu LPG cylinder: इंडियन ऑइलने ‘छोटू’ नावाचा 5 किलो LPG सिलेंडर लॉन्च केला आहे, जो बुकिंगशिवाय थेट खरेदी करता येतो. यासाठी फक्त ओळखपत्र आवश्यक असून पत्त्याचा पुरावा लागत नाही.
Indane Chotu LPG cylinder
Indane Chotu LPG cylinderPudhari
Published on
Updated on

Indane Chotu LPG cylinder: घरगुती गॅससाठी बुकिंगची कटकट आणि डिलिव्हरीची वाट पाहणे... या सगळ्याला आता पर्याय मिळण्याची शक्यता आहे. Indian Oil Corporation (IOCL) ने आपल्या Indane ब्रँडअंतर्गत 5 किलोचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात आणत ग्राहकांसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

‘छोटू’ सिलेंडर म्हणजे नेमकं काय?

‘छोटू’ हा 5 किलो वजनाचा छोट्या आकाराचा LPG सिलेंडर आहे, जो “Free Trade LPG” (FTL) या श्रेणीत येतो. याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांना बुकिंग शिवाय गॅस उपलब्ध करून देणे.

Indane Chotu LPG cylinder
New Labour Code: 1 एप्रिलपासून नवे लेबर कोड लागू होणार; कामाचे तास, ओव्हरटाईम आणि पगाराच्या नियमांमध्ये मोठे बदल

बुकिंगची गरज नाही, थेट खरेदी

या सिलेंडरची सर्वात मोठी खासियत म्हणजे कोणतीही बुकिंग करण्याची गरज नाही. थेट एजन्सी किंवा दुकानातून खरेदी करता येतो. IOCL च्या मते, हा सिलेंडर तत्काळ गरज पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

कागदपत्रांची कटकट नाही

सामान्य LPG कनेक्शनसाठी पत्ता, कागदपत्रे आणि ऑनलाईन प्रक्रिया आवश्यक असते.
मात्र ‘छोटू’ सिलेंडरसाठी फक्त ओळखपत्र पुरेसे आहे. पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही. यामुळे विद्यार्थी, स्थलांतरित कामगार किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी हा पर्याय अधिक चांगला आहे.

Indane Chotu LPG cylinder
Maharashtra Weather: पुणे-नाशिकसह 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा, पुढील काही तास महत्त्वाचे

कुठे मिळणार ‘छोटू’?

हा सिलेंडर केवळ गॅस एजन्सीपुरता मर्यादित नाही. हा सिलेंडर Indane गॅस एजन्सी, किराणा दुकानं आणि अधिकृत विक्री केंद्रावर उपलब्ध असेल. ‘छोटू’ सिलेंडर प्रवास किंवा पिकनिक, छोटे घर किंवा सिंगल यूजर्स, तातडीच्या गरजेसाठी, विद्यार्थी किंवा कामगार यांच्यासाठी उपयुक्त आहे. हा सिलेंडर हलका आणि पोर्टेबल आहे.

‘छोटू’ LPG सिलेंडर हा पारंपरिक गॅस सिस्टमला एक स्मार्ट पर्याय म्हणून पुढे येत आहे. बुकिंगची वाट न पाहता, थेट खरेदी करून वापरण्याची सुविधा ही त्याची मोठी ताकद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news