Gold Silver Price Today: सोन्याचे भाव धडाम! सलग सातव्या दिवशी दर कोसळले; पाहा तुमच्या शहरातील नवे दर

Gold Silver Price Today: देशात सोन्याच्या दरातील घसरण कायम असून, 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,33,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरातील घसरण कायम आहे. आज 19 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,33,400 रुपयांवर आला आहे. तर मुंबईमध्ये हाच दर 1,33,250 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत सलग सातव्या दिवशी घसरण झाली आहे. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर एकाच दिवसात प्रति 10 ग्रॅम 2,800 रुपयांनी घसरला. जागतिक बाजारात सोन्याची विक्री वाढल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट दर 3,745.56 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय?

19 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार -

दिल्ली: राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,33,400 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,22,290 रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबई आणि कोलकाता: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,33,250 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,22,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई: चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,33,250 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळुरू: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,33,250 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,22,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

भारतात सोन्याची आयात घटण्याचा अंदाज

दरम्यान, भारताच्या सोन्याच्या आयातीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताची सोन्याची आयात 40 अब्ज डॉलरपर्यंत खाली येण्याचा अंदाज वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने सुमारे 72 अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले होते. मात्र, यंदा मे महिन्यात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यामुळे सोन्याच्या आयातीत घट झाली आहे. सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्के केले होते.

याचा परिणाम आयातीवर दिसून येत आहे. चालू वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या काळात भारताची सोन्याची आयात सुमारे 40 टक्क्यांनी कमी होऊन 24.78 अब्ज डॉलरवर आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही आयात 41.24 अब्ज डॉलर होती. सोन्याची आयात कमी झाल्यामुळे देशाची व्यापारी तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होत आहे.

Gold Silver Price Today
Sona Mohapatra on Salman Khan: ‘तेरी सेक्सी ब्यूटी...’, सलमान खानच्या नव्या गाण्यावर सोना महापात्रा संतापली; जुन्या वादावरही केलं भाष्य

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही घसरण सुरूच आहे. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो 1,84,900 रुपयांवर आला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात एका दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल 5,000 रुपयांची घट झाली आहे.

Gold Silver Price Today
Ramayana Movie Controversy: ‘रामायण’ चित्रपट अडचणीत! रावण आणि राम-लक्ष्मणांच्या चित्रणावरून हिंदू संघटनांचा संताप; बहिष्काराची मागणी

विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने देशांतर्गत बाजारात प्रति किलो 4 लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट दर 45.61 डॉलर प्रति औंसवर आहे.

नोंद: प्रत्यक्ष खरेदी करताना शहर, सराफा दुकान, जीएसटी आणि घडणावळीनुसार अंतिम किंमत बदलू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.