

Gold Price Today: उद्या अक्षय तृतीया आहे आणि त्याआधीच सराफा बाजारात मोठी हालचाल दिसतेय. गेल्या काही दिवसांत जागतिक पातळीवर तणाव वाढला होता, विशेषतः मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे. पण आज मात्र गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी थोडा दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात हलकी घसरण झाली आहे.
अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. दिल्लीमध्ये चांदीच्या दरात तब्बल 5,700 रुपयांची घसरण झाली असून ती आता 2.53 लाख प्रति किलोवर आली आहे. सोनेही स्थिरावले असून 10 ग्रॅमसाठी सुमारे 1.56 लाखांच्या आसपास दर आहे.
आज देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम) असे आहेत:
दिल्ली – ₹15,434
मुंबई – ₹15,419
पुणे – ₹15,419
ज्वेलरीसाठी वापरलं जाणारं 22 कॅरेट सोनं आज सुमारे 14,134 रुपये प्रति ग्रॅम आहे.
शुद्ध गुंतवणुकीसाठी वापरलं जाणारं 24 कॅरेट सोनं 15,419 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोनं 11,564 रुपये प्रति ग्रॅम दराने मिळत आहे.
चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सुमारे 2.2% म्हणजेच 5,700 रुपयांनी दर कमी होऊन 2,53,000 रुपये प्रति किलो झाला आहे. औद्योगिक मागणीत घट आणि जागतिक अनिश्चितता हे यामागचं प्रमुख कारण मानलं जातंय.
तज्ञांच्या मते, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे बाजारात अनिश्चितता आहे. गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉच मोडमध्ये आहेत. त्यामुळे दरात चढ-उतार सुरू आहेत.
अक्षय तृतीया हा सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. आज दरात झालेली ही छोटी घसरण खरेदीदारांसाठी चांगली संधी आहे. खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.