Gold-Silver Import Policy : केंद्र सरकारने 15 बँकांना दिली सोने-चांदी आयातीची परवानगी

मागणी-पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका टळला
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकेसह देशातील 15 बँकांना केंद्र सरकारने सोने-चांदीची आयात करण्याची परवानगी दिली आहे. आयातीची मुदत 31 मार्च 2029 पर्यंत असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याच कालावधीत दोन बँकांना केवळ सोने आयातीची परवानगी देण्यात आली आहे.

एप्रिल 2025 मध्ये जारी केलेला पूर्वीचा आदेश 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत वैध होता. बँका डीजीएफटीच्या नवीन निर्देशाची वाट पाहात होत्या. हा आदेश नसल्याने सीमा शुल्क विभागाने 5 टनहून अधिक सोने आणि सुमारे 8 टन चांदी रोखून धरल्याची माहिती एका खासगी बँकेतील मुंबईस्थित सराफ व्यापाऱ्याने माध्यमांना दिली होती.

सोन्याची आयात थांबल्याचे वृत्त पसरल्यानंतर शुक्रवारी कल्याण ज्वेलर्स, टायटन कंपनीचा शेअरभाव तीन ते सहा टक्क्यांनी घसरला होता.

सरकारने शुक्रवारी सोने-चांदीची आयात करण्यास परवानगी असलेल्या बँकांची यादी जाहीर केली.

त्यानुसार ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, ड्युईश बँक, फेडरल बँक लिमिटेड, एचडीएफसी बँक, इंडस्ट्रिअल अँक कमर्शिअरल बँक ऑफ चायना, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, इंडियन ओव्हरसीज, कोटक महिंद्रा, करुर वैश्य बँक, पंजाब नॅशनल बँक, आरबीएल बँक, एसबीआय आणि येस बँकेला सोन-चांदी दोन्ही आयात करता येतील. तर युनियन बँक ऑफ इंडिया आणि स्बर बँकेला 31 मार्च 2029 या कालावधीपर्यंत केवळ सोने आयात करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news