Diljit Dosanjh: १३ रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना विकली! दिलजीतच्या कॉन्सर्टबाहेर २ तासांत किती कमावले? आकडा वाचून थक्क व्हाल

Diljit Dosanjh Concert Water Bottle Business: दिलजीत दोसांझ यांच्या दिल्लीतील कॉन्सर्टबाहेर एका तरुणाने पाण्याच्या बाटल्या विकून अवघ्या दोन तासांत २४ हजार रुपयांची विक्री केल्याचा दावा केला आहे.
Diljit Dosanjh Concert Water Bottle Business
Diljit Dosanjh Concert Water Bottle BusinessPudhari
Published on: 
Updated on: 

Diljit Dosanjh Concert Water Bottle Business: पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांचा नुकताच दिल्लीत भव्य कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गाणी, संगीत आणि उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, या गर्दीचा फायदा घेत एका तरुणाने चक्क पाणी विकून अवघ्या दोन तासांत हजारो रुपये कमावले आहेत. सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या कमाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये हा तरुण स्वतःचा अनुभव सांगताना दिसत आहे. त्याने दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टच्या ठिकाणी जाऊन पाण्याच्या बाटल्या विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यासाठी त्याने कोणतेही दुकान लावले नव्हते. तो पाण्याच्या बाटल्यांचे पॅकेट घेऊन थेट कॉन्सर्टला आलेल्या लोकांमध्ये गेला आणि बाटल्यांची विक्री करू लागला.

कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी असल्याने पाण्याला मोठी मागणी होती. त्यामुळे त्याला फारशी मेहनत न करताच चांगली विक्री करता आली. त्याने १३ रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली थेट ५० रुपयांना विकली. लोकही पाण्याची गरज असल्याने त्याच्याकडून बाटल्या खरेदी करत होते.

दोन तासांत विकल्या ४८० बाटल्या!

या तरुणाने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, त्याने अवघ्या दोन तासांत पाण्याच्या ४० पॅकेटची विक्री केली. एका पॅकेटमध्ये १२ बाटल्या होत्या. म्हणजेच त्याने एकूण ४८० बाटल्या विकल्या. प्रत्येक बाटलीसाठी त्याला ५० रुपये मिळाले.

या हिशोबानुसार, त्याची एकूण विक्री २४ हजार रुपये झाली. तर १३ रुपये प्रति बाटली या दराने त्याने पाणी खरेदी करण्यासाठी ६ हजार २४० रुपये खर्च केले होते. त्यामुळे इतर खर्च वजा करुन त्याला १७ हजार ७६० रुपयांचा नफा झाला. विशेष म्हणजे, हा सगळा व्यवहार त्याने केवळ दोन तासांत केला.

Diljit Dosanjh Concert Water Bottle Business
New Airfare Rules 2027: विमान प्रवास महागणार? कंपन्यांना तिकिटांचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य; हवाई भाड्याबाबत नवा नियम

सोशल मीडियावर तरुणाच्या व्यवसायाची चर्चा

या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या व्यवसाय करण्याच्या कल्पनेचे कौतुक केले आहे. तर काहींनी कॉन्सर्टमध्ये पाण्याच्या बाटलीसाठी ५० रुपये मोजणे योग्य असल्याचे म्हटले आहे.

Diljit Dosanjh Concert Water Bottle Business
Shah Rukh Khan King Movie: थिएटरमध्ये येण्याआधीच ‘किंग’चा जलवा! ४०० कोटींच्या चित्रपटाने कमावले ८०० कोटी, कमाईचं गणित काय?

मोठ्या कार्यक्रमांमध्ये गर्दी आणि लोकांची गरज ओळखून छोट्या व्यवसायातूनही चांगली कमाई करता येऊ शकते, हे या घटनेतून दिसून आले आहे. कोणतेही दुकान न लावता आणि कमी भांडवलात या तरुणाने दोन तासांत केलेली कमाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.