

Gold Price Drop: जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या अगदी योग्य वेळ आहे. कारण बाजारातून एकाच वेळी दोन मोठ्या चांगल्या बातम्या समोर आल्या आहेत. एक म्हणजे सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाली आहे आणि दुसरी म्हणजे अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या हंगामामुळे ज्वेलर्सकडून जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत.
अलीकडच्या काळात सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता लोक फक्त गुंतवणुकीसाठीच नाही, तर लग्नांसाठीही सोन्याची आगाऊ खरेदी करत आहेत. बाजारात पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढू लागली असून ज्वेलर्सही उत्साहात आहेत.
भारतात अक्षय तृतीया हा सोनं खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यावर्षी हा सण 19 एप्रिलला आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरातील ज्वेलरी शोरूम्सनी नवीन डिझाइन्स आणि आकर्षक ऑफर्ससह तयारी सुरू केली आहे.
आजकाल तरुण पिढी हलक्या वजनाच्या दागिन्यांकडे वळत आहे. 9 ते 18 कॅरेटमधील लाइटवेट ज्वेलरी कमी किमतीत आणि स्टायलिश असल्यामुळे जास्त लोकप्रिय होत आहे. हे दागिने रोजच्या वापरासाठीही योग्य आहेत.
अनेक मोठ्या ब्रँड्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर्स देत आहेत:
Malabar Gold & Diamonds – मेकिंग चार्जवर 30% पर्यंत सूट
Indriya – 35% सूट + प्राइस लॉक सुविधा
Kalyan Jewellers – डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत टायअप, फ्री सिल्व्हर कॉइन
Kisna Diamond & Jewellery – गोल्ड रेट प्रोटेक्शन प्लॅन
Bhima Gold – खास थीम कलेक्शन
Limelight Diamonds – मेकिंग चार्जवर 50% पर्यंत सूट
Reva Diamonds – 100% पर्यंत मेकिंग चार्ज सूट
याशिवाय SBI कार्ड वापरल्यास ₹4000 पर्यंत कॅशबॅक मिळत आहे.
आज अनेक ज्वेलर्स “प्राइस लॉक” सुविधा देत आहेत. म्हणजे थोडे पैसे भरून तुम्ही आजचा सोन्याचा दर लॉक करू शकता आणि नंतर खरेदी करू शकता. तसंच Paytm सारख्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्डची सुविधा उपलब्ध आहे. कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते.