Engineer Salary: फक्त 9 रुपये पगारवाढ! इंजिनिअर संतापला, म्हणाला, गुलामासारखं काम करतोय... सोशल मीडियावर मांडली व्यथा

Engineer Salary Hike Controversy: दिल्लीतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला फक्त 9 रुपयांची पगारवाढ मिळाल्याने तो नाराज झाला आहे. Reddit वर त्याने आपली व्यथा मांडत जास्त काम आणि कमी पगाराचा मुद्दा मांडला.
Engineer Salary Hike Controversy
Engineer Salary Hike ControversyPudhari
Published on
Updated on

Engineer Salary Hike Controversy: दिल्ली-एनसीआरमध्ये काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याने आपल्या नोकरीबद्दलचा अनुभव Reddit वर शेअर केला आणि त्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. या इंजिनिअरचा संताप यासाठी आहे की, 2025 मध्ये त्याच्या पगारात फक्त 9 रुपयांची वाढ झाली आणि 2026 मध्ये तर वाढच झाली नाही.

सुरुवात इंटर्नशिपपासून

या इंजिनिअरने मे 2024 मध्ये एका कंपनीत इंटर्नशिप सुरू केली होती. ही इंटर्नशिप 6 महिन्यांची होती. त्यानंतर त्याला त्याच कंपनीत फुल-टाइम जॉब मिळाला. त्याचं पॅकेज 4.25 लाख रुपये वार्षिक होतं. पण प्रत्यक्षात हातात येणारा पगार खूपच कमी असल्याचं त्याने सांगितलं. त्या वेळी जॉब मार्केट कमकुवत असल्यामुळे आणि पर्याय कमी असल्यामुळे त्याने ही नोकरी स्वीकारली.

नोकरी सोडणंही सोपं नाही

या नोकरीत एक मोठा अडथळा म्हणजे 2 वर्षांचा सर्व्हिस बॉन्ड. जर त्याने 2 वर्षांपूर्वी नोकरी सोडली, तर त्याला 1.5 लाख रुपये द्यावे लागतील. याशिवाय, नोकरी सोडण्यासाठी 6 महिन्यांचा नोटिस पीरियडही आहे. या नियमांमुळे तो नोकरी बदलण्याचा विचार करु शकत नाही.

9 रुपयांची पगारवाढ

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याचं इंक्रीमेंट. पहिल्या वर्षी त्याला फक्त 9 रुपयांची वाढ मिळाली. आणि दुसऱ्या वर्षी तर तीही मिळाली नाही. म्हणजे दोन वर्षं काम करूनही त्याचा पगार जवळपास तसाच राहिला आहे.

Engineer Salary Hike Controversy
8th Pay Commission: महिन्याला फक्त 12 दिवस काम; मिळणार 90 हजार पगार, 8व्या वेतन आयोगात नोकरीची संधी

कामाचा प्रचंड ताण

या इंजिनिअरने कामाच्या वातावरणाबद्दलही गंभीर मुद्दे मांडले आहेत. त्याला ऑफिसचं काम तर करावंच लागतं, पण त्यासोबत क्लायंटच्या साइटवरही जावं लागतं. त्यामुळे कामाचा ताण आणखी वाढतो. तो म्हणतोय, “मी गुलामासारखं काम करतोय.”

खर्चही वाढतोय

प्रवासासाठी त्याला वेगळे पैसे दिले जात नाहीत. उलट, कंपनीच्या शटलसाठी त्याच्या पगारातून पैसे कापले जातात. यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्याला अनेकदा शनिवार-रविवारीही काम करावं लागतं. त्याच्या बदल्यात कंपनी सुट्टी देते, पण त्याच्या मते इतक्या मेहनतीनुसार त्याला योग्य मोबदला मिळत नाही.

Engineer Salary Hike Controversy
Vinesh Chandel Arrested: बंगाल निवडणुकीआधी मोठी कारवाई! I-PAC संचालक विनेश चंदेल ED च्या ताब्यात; राजकीय वाद पेटला

प्रमोशन मिळालं… पण समस्या कायम

त्याने प्रोजेक्ट बदलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कंपनीने त्याला प्रमोशन दिलं. पण त्याचा फायदा झाला नाही. कारण पगार कमीच राहिला आणि काम वाढलं.

ही कहाणी फक्त एका इंजिनिअरची नाही, तर अनेक तरुणांची आहे. कमी पगार, जास्त काम, बॉन्ड आणि मर्यादित पर्याय, यामध्ये अनेक जण अडकलेले आहेत. हा मुद्दा केवळ एका पोस्टपुरता मर्यादित नाही, तर आजच्या जॉब मार्केटमधील वास्तवही आपल्याला दाखवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news