Gold Price Today: चांदी उच्चांकापेक्षा 1.96 लाखांनी, तर सोने 50,000 रुपयांनी कोसळले; काय आहे आजचा भाव?

Gold price Fall Today: अमेरिका-इराण तणाव वाढल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. तेलाच्या दरवाढीमुळे बाजारावर दबाव वाढला आहे.
Gold Price Today
Gold Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold price Fall Today: अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढताच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून त्याचा थेट परिणाम बुलियन मार्केटवर झाला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेची चर्चा निष्फळ ठरल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेत बंदरांवर नाकेबंदी जाहीर केली, तर इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केल्याची बातमी आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून ब्रेंट क्रूड पुन्हा 100 डॉलरच्या पुढे गेला आहे.

तेलाच्या किमतीत झालेल्या या वाढीचा परिणाम सोन्या-चांदीवर झाला आहे. MCX वर आज सोमवारी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. 10 ग्रॅम सोने सुमारे 744 रुपयांनी घसरून 1,52,690 रुपयांवर आले. चांदीतही घसरण झाली आणि ती 468 रुपयांनी कमी होऊन किलोमागे सुमारे 2,43,300 रुपयांवर पोहोचली.

आज चांदी तिच्या विक्रमी उच्चांकापेक्षा प्रति किलोग्राम सुमारे 1.96 लाखांनी स्वस्त झाली आहे. दरम्यान, सोने त्याच्या उच्चांकापेक्षा प्रति 10 ग्रॅम सुमारे 50,000 ने स्वस्त झाले आहे. यावर्षी 29 जानेवारी रोजी सोने आणि चांदी या दोन्हींनी विक्रमी उच्चांक गाठला होता. या कालावधीत चांदीचा भाव प्रति किलोग्राम 4.25 लाख आणि सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.90 लाखांवर पोहोचला होता.

Gold Price Today
New Labour Code: आता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत; सुट्ट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे, सरकारने बदलले नियम

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. डॉलर कमकुवत होणे आणि मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे सोन्याला आधार मिळाला होता. मात्र, आता पुन्हा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बाजारात अस्थिरता वाढली आहे.

Gold Price Today
Supreme Court: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भेदभाव करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

तज्ज्ञांच्या मते, हा संपूर्ण आठवडा सोन्या-चांदीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे, फेडरल रिझर्व्हची भूमिका, कच्च्या तेलातील चढ-उतार आणि चीनचे आर्थिक संकेत यावर पुढील किमती ठरणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news