Chief AI Officer: भारतीय कंपन्यांमध्ये AIची एन्ट्री; तुमचा पुढचा बॉस AI असणार, ऑफिसचं चित्र पूर्ण बदलणार

Chief AI Officer India: भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये आता “Chief AI Officer” नेमण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. AI हा फक्त तांत्रिक प्रयोग न राहता आता कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांचा भाग बनत आहे.
Chief AI Officer India
Chief AI Officer IndiaPudhari
Published on
Updated on

Chief AI Officer India Rise: भारतीय कंपन्यांमध्ये AI आता फक्त प्रयोगापुरते मर्यादित राहिलेले नाही. गेल्या एका वर्षात देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये AI थेट व्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी पोहोचले आहे. फिनटेक, बँकिंग, उत्पादन, लॉजिस्टिक्स, मीडिया आणि एंटरप्राइज टेक्नॉलॉजी अशा अनेक उद्योगांमध्ये वरिष्ठ पातळीवर AIची मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झाली आहे. लाँगहाऊसच्या आकडेवारीनुसार, मागील 12 महिन्यांत वरिष्ट पातळीवर किमान 50 नियुक्त्या झाल्या असून त्यात ‘Chief AI Officer’ (CAIO) या नव्या पदाचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या नियुक्त्यांचा वेग मागील सहा महिन्यांत प्रचंड वाढला आहे. नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण नियुक्त्यांपैकी एक तृतीयांशाहून अधिक नियुक्त्या अशा पद्धतीने झाल्या आहेत. यावरून स्पष्ट होते की, भारतीय कंपन्या AI कडे आता स्वतंत्र टेक प्रोजेक्ट म्हणून न पाहता संपूर्ण व्यवसाय चालवणारी यंत्रणा म्हणून पाहू लागल्या आहेत.

लाँगहाऊसचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन दास यांच्या मते, AI आता बोर्ड-लेव्हलवर काम करत आहे. आधी इंजिनिअरिंग टीमपुरते मर्यादित असलेले AI आता थेट ऑफिसमध्ये पोहोचले आहेत. कंपन्या आता AI अधिकारी नेमून डेटा, मॉडेल्स आणि व्यावसायिक वापर यांचा समन्वय साधत आहेत.

याचा परिणाम असा झाला की, अनेक स्टार्टअप्स आणि प्रस्थापित कंपन्यांनी पारंपरिक Chief Technology Officer (CTO) पदालाच नवे स्वरूप दिले आहे. काही कंपन्यांनी तर CTO पद रिक्त ठेवून AI ला जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये Zomato, Swiggy, Ola Electric Mobility, BookMyShow आणि Udaan यांसारख्या कंपन्यांचा यात समावेश आहे.

Chief AI Officer India
Gen Z Trend: नोकरी लागताच सर्वात अगोदर Zen Z काय खरेदी करत आहेत? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

50 हून अधिक नियुक्त्यांपैकी किमान 15 पदे Chief AI Officer या स्वरुपाची आहेत. काही कंपन्यांनी तर ‘Chief AI and Technology Officer’ अशी संयुक्त पदे निर्माण केली आहेत.

विशेषतः BFSI (बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा) क्षेत्र या बदलात आघाडीवर आहे. Motilal Oswal, Mirae Asset, IndusInd Bank यांसारख्या वित्तीय संस्थांबरोबरच Jindal Steel आणि Blue Star यांसारख्या औद्योगिक समूहांनीही AI स्वीकारायला सुरुवात केली आहे.

मीडिया क्षेत्रही या शर्यतीत मागे नाही. India Today, JioStar आणि Pocket FM यांसारख्या कंपन्यांनी कंटेंट निर्मिती आणि वितरणासाठी AI-आधारित स्वतंत्र पदे तयार केली आहेत.

मात्र या सगळ्या बदलांमध्ये एक चिंताजनक बाब म्हणजे लैंगिक असमतोल. 50 नियुक्त्यांपैकी केवळ दोन महिला अधिकारी या वरिष्ठ AI पदांवर आहेत. AI नेतृत्वात महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी असल्याचे यावरुन दिसून येते.

Chief AI Officer India
Pakistan Video: पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद; सलमान अली आगा कोचला भिडला, व्हिडिओ होतोय व्हायरल

हा ट्रेंड केवळ भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक स्तरावरही Chief AI Officer यांची नियुक्ती होत आहे. IBM Institute for Business Value च्या अभ्यासानुसार, भारतातील 25 टक्के कंपन्यांमध्ये आधीच CAIO आहे, तर पुढील दोन वर्षांत 67 टक्के कंपन्या हे पद निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.

AI अधिकारी नेमण्यामागचं कारण:

  • खर्च कमी होतो

  • काम लवकर होतं

  • डेटा वापरून अचूक निर्णय घेता येतात

  • नफा वाढतो

ज्या कंपन्या AI वापरतात त्यांना साधारण 10% जास्त फायदा होत असल्याचं अभ्यासात दिसलं आहे. हा Chief AI Officer म्हणजे साधा कर्मचारी नाही. हा थेट CEO च्या लेव्हलचा अधिकारी असतो. त्याचा पगार काही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news