वेध शेअर बाजाराचा : दिशाहीन बाजार…

वेध शेअर बाजाराचा : दिशाहीन बाजार…

सप्ताहाचे पहिले चारही दिवस मंदीच्या आवर्तात सापडलेल्या बाजारात शुक्रवारी अकस्मात खरेदीने जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सप्ताहाच्या अखेरीस 22000 ची पातळी निफ्टीने सोडली नाही. अन्यथा दोन वेळा तो 22000 च्या खाली घसरला होता. निफ्टी आणि सेन्सेक्स अडीच टक्क्यांहून अधिक, तर बँक निफ्टी साडेतीन टक्क्यांहून अधिक खाली गेले. मिड कॅप इंडेक्सचीही तीच कथा स्मॉल कॅप इंडेक्स, तर पाच टक्क्यांहून अधिक घरंगळला.

FMCG आणि Auto वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक सप्ताहात रेड झोनमध्ये होते. सर्वात मोठी घसरण दर्शवली. Nifty PSU Bank इंडेक्सने बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया पंजाब । सिंध बँक या सर्व बँका आठ टक्क्यांहून अधिक कोसळल्यामुळे PSU Bank Index पावणेसात टक्के घसरला. कॅनरा बँक तर 13 टक्के आणि पीएनबी सव्वा दहा टक्के घसरले. निफ्टीच्या PSU Bank Index मध्ये पीएनबीचे वेटेज 34.63 टक्के आहे.

Nifty PSU Bank च्या खालोखाल Nifty Infra इंडेक्सने सर्वात जास्त घसरण दर्शवली. रिलायन्स 4 टक्के, आयओसी 8.33 टक्के, तर टाटा पॉवर 9.39 टक्के कोसळले. हा आयओसी म्हणजे इंडियन ऑईल्स कॉर्पोरेशनच्या शेअर आज रु. 159.25 ला मिळतो आहे. त्याचा PE आहे. 5.26 वर्षभरात तो 200 रुपयेच्या पातळीला धडकून खाली आला आहे. (रु. 196.80) तर त्याच्या बाबतीत एक चांगली बाब अशी की, मागील वर्षी तो Dividend Yield च्या बाबतीत सर्वाधिक डिव्हिडंड देणारा शेअर ठरला आहे कारण त्याने प्रती शेअर रु. 12 डिव्हिडंड दिला. आणि शेअरचा सध्याचा भाव पाहता, Dividend Yield मिळाले साडेसात टक्के! हा साडेसात टक्के दर राष्ट्रीयीकृत बँक मुदतबंद ठेवीवरील व्याजदरापेक्षा अधिक आहे. शिवाय मागील एका वर्षात IOC चा शेअर 90 टक्के वाढला आहे. शेअर बाजाराचा चौफेर अभ्यास असेल, तर धनप्राप्तीच्या अशा खूप संधी मिळतात.

टाटा पॉवरने आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. निव्वळ नफ्यात YOY धर्तीवर 15 टक्के वाढ झाली. 3 मे 2024 रोजी रु. 464.30 हा आपला सार्वकालिक उच्चांक नोंदवला. परंतु, तेव्हापासून त्याची घसरण सुरू असून आज तो रु. 415 पर्यंत खाली आला आहे. इतकेच नव्हे, तर CLSA Kotak आणि Goldan Sachs या रेटिंग एजन्सीजनी त्याची Target Price अनुक्रमे रु. 297, रु. 265 आणि रु. 240 इतकी खालची दिली आहे.

Stock Market
Stock Market

JWL (Jupiter Wagons Ltd.) चा शेअर गतसप्ताहात 20 टक्क्यांहून अधिक वाढला. (Cmp – रु. 484.10) मागील एका वर्षात तो 335 टक्के वाढला आहे. रेल्वेसाठी बॅगम्स आणि कोचेस निर्माण करणारी ही कंपनी. या निमित्ताने इतरही रेल्वे कंपन्यांचा मागील वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला, तर पुढीलप्रमाणे सुखद चित्र आपल्याला दिसते.

बाजारातील घसरण ही 4 जून म्हणजे निवडणुकांचे निकाल येईपर्यंत अशीच राहील, हे ओघानेच आले. परंतु, घसरणीबरोबरच मार्केटमध्ये Volotility म्हणजे चढ-उतार प्रचंड आहेत. त्यामुळे मध्यम ते दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांनी सध्या तरी गुंतवणूक करू नये. परंतु, इंट्रा डे ट्रेडिंग करणार्‍या टे्रडर्ससाठी सध्याचे मार्केट सुवर्णसंधी आहे. परंतु, त्यासाठी कंपन्यांचे आर्थिक निकाल, ग्लोबल न्यूज यांच्याकडे सतर्क नजर हवी. यांच्या जोडीला ज्यांनी कंपन्यांच्या 52 थशशज्ञ कळसह आणि ङेु च्या आकड्यांचा अभ्यास करून टेड्रिंग केले, त्यांनी चांगला नफा कमावला. कसा ते वरील एका कंपनीच्या उदाहरणावरून लक्षात येईल.

Stock Market
Stock Market

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news