Gold Prices Today | अक्षय्यतृतीयेच्या तोंडावर सोने दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर | पुढारी

Gold Prices Today | अक्षय्यतृतीयेच्या तोंडावर सोने दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

पुढारी ऑनलाईन : उद्या शनिवारी (दि.२२) अक्षय्यतृतीया आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshaya Tritiya २०२३) एक शुभमुहूर्त समजल्या जाणाऱ्या या दिवशी सोने खरेदी केली जाते. अक्षय्यतृतीयाच्या एक दिवस अगोदर सोने आणि चांदी दरात घट झाली आहे. आज शुक्रवारी शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६०,४४६ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७४,७६३ रुपयांवर आहे. काल गुरुवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,६१६ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ७५,४१९ रुपयांवर होता. (Gold Prices Today)

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६०,४४६ रुपये, २३ कॅरेट ६०,२०४ रुपये, २२ कॅरेट ५५,३५९ रुपये, १८ कॅरेट ४५,३३५ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३५,३६१ रुपयांवर खुला झाला आहे.

MCX वर सोने फ्यूचर्सचा (५ जून) दर २४८ रुपयांनी म्हणजेच ०.४१ टक्क्यांनी घसरून ६०,२५५ रुपयांवर होता. दरम्यान, चांदीचा भाव ३११ रुपयांनी कमी होऊन ७५,१९० रुपयांवर होता. गेल्या वर्षी अक्षयतृतीया दरम्यान २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८,४९० रुपये होता. यंदा हा दर ६० हजारांवर गेला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी अधिक आहे. (Gold Prices Today)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

 हे ही वाचा :

Back to top button