Gold Prices Today | अक्षयतृतीयेला सोनं खरेदी करणार आहात? त्याआधी जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshaya Tritiya २०२३) एक शुभमुहूर्त समजला जातो. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. यामुळे सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. अक्षयतृतीया दोन दिवसांवर असतानाच आज शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६०,५१७ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७५,११२ रुपयांवर पोहोचला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज गुरुवारी सोन्याचा २४ कॅरेट दर प्रति १० ग्रॅम ६०,५१७ रुपये, २३ कॅरेट ६०,२७५ रुपये, २२ कॅरेट ५५,४३४ रुपये, १८ कॅरेट ४५,३८८ रुपये, १४ कॅरेटचा दर ३५,४०२ रुपयांवर खुला झाला आहे.

काल बुधवारी हा दर अनुक्रमे प्रति १० ग्रॅम ५९,९२१ रुपये, ५९,६८१ रुपये, ५४,८८८ रुपये, ४४,९४१ रुपये आणि ३५,०५४ रुपयांवर होता. काल चांदीचा दर प्रति किलो ७३,७७५ रुपयांवर बंद झाला होता. (Gold Prices Today)

दरम्यान, कमकुवत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत वायदे बाजारात सोने आणि चांदी दरात घट होताना दिसून येत आहे. आज गुरुवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर ( MCX) सोने जून फ्यूचर्सचा दर प्रति १० ग्रॅम ६०,१९९ रुपयांवर आला. तर चांदी मे फ्यूचर्सचा दर २५७ रुपयांनी कमी होऊन प्रति किलो ७५,२१५ रुपयांवर व्यवहार करत आहे. (Gold Prices Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचा दरात घट झाली आहे. कारण प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढली आहे. तसेच गुंतवणूकदारांमध्ये व्याजदरवाढीची चिंता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस २ हजार डॉलरवर आहे. सोन्याच्या दरात ३ डॉलरने घट झाली आहे. तर चांदीचा दर प्रति औंस २५.२६ डॉलरवर आहे. (Gold Prices Today)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news