Child Obesity Treatment : लठ्ठपणाने त्रस्त मुलांवरील उपचारात शस्त्रक्रिया अयोग्य! WHOच्‍या नवी नियमावलीत 'या' गोष्टींवर भर

Childhood Obesity WHO Guidelines : मुलांमधील लठ्ठपणासाठी वजन कमी करणारी शस्त्रक्रिया किंवा वजन व्यवस्थापनाची साधने वापरू नयेत.

Childhood Obesity WHO Guidelines
प्रतिकात्‍मक छायाचित्र. AI-generated image
Published on: 
Updated on: 

Obesity WHO Guidelines : जगभरात ५ ते १९ वयोगटातील सुमारे १७ कोटी मुले लठ्ठपणाशी झुंज देत होती, अशी आकडेवारी २०२४ मध्ये समोर आली. आता मागील दोन वर्षांत या आकडेवारीत वाढ झाली आहे. मुलांमधील लठ्ठपणा हा आरोग्यविषयक आव्हानाचा एक भागच बनला आहे; कारण १९९० पासून या वयोगटातील लठ्ठपणाचे प्रमाण चौपट झाले आहे. आता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुलांमधील लठ्ठपणावर कशा प्रकारे उपचार केले जावेत, याबद्दल अधिक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत. नुकत्‍याच जारी करण्‍यात आलेल्‍या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, या जागतिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे की, १० वर्षांखालील मुलांवर लठ्ठपणासाठी वजन कमी करणारी शस्त्रक्रिया किंवा वजन व्यवस्थापनाची साधने वापरली जाऊ नयेत, असे स्पष्ट केले आहे.

१० वर्षांखालील मुलांसाठी WHO ने कोणती शिफारस केली?

⦁ जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम आणि जीवनशैलीत हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या सर्वसमावेशक उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुढील शिफारसी केल्या आहेत.

⦁ ० ते ९ वयोगटातील मुलांसाठी औषधोपचार, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया किंवा वजन नियंत्रक उपकरणांची शिफारस केलेली नाही.

⦁ लहान वयात केवळ वजन कमी करण्यावर भर न देता मुलांची शारीरिक वाढ, आरोग्य आणि एकूणच मानसिक व शारीरिक संपन्नतेवर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे.


Childhood Obesity WHO Guidelines
Soy Milk Health Benefits : दूध पचत नाही का? मग प्या सोया मिल्क! पाहा हे '६' भारी फायदे

‘दीर्घकालीन आणि पुनरावृत्ती होणारा आजार’

तज्ज्ञांच्या मते, बालपणीचा लठ्ठपणा हा केवळ शारीरिक बांध्याशी किंवा सौंदर्याशी जोडलेला विषय नाही. डब्ल्यूएचओने लठ्ठपणाचे वर्णन एक ‘दीर्घकालीन आणि पुनरावृत्ती होणारा आजार’ असे केले आहे. बालपणातील लठ्ठपणामुळे भविष्यात टाईप २ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय, लठ्ठपणाचा त्रास सहन करणाऱ्या मुलांना अनेकदा सामाजिक भेदभाव, टोमणे आणि मानसिक ताणाला सामोरे जावे लागते, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.


Childhood Obesity WHO Guidelines
Childhood Obesity : लहान मुलांमधील लठ्ठपणाला कारणीभूत ठरतात 'जीन्स'? 'BMI'वरील नवा रिसर्च काय सांगतोय?

किशोरवयीन मुलांसाठी (टीनएजर्स) उपचारांचे नियम काय आहेत?

⦁ १० ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या बाबतीत मात्र धोरणात थोडा बदल करण्यात आला आहे:

⦁ जीवनशैलीत बदल करूनही हवा तसा फायदा झाला नाही, तर योग्य देखरेखीखाली मंजूर केलेली वजन कमी करण्याची औषधे देण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येक किशोरवयीन मुलाला सरसकट औषधे दिली जावीत, असा होत नाही.

⦁ अतिशय गंभीर स्वरूपाचा लठ्ठपणा असलेल्या किशोरवयीन मुलांसाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो, परंतु ती अत्यंत कडक अटींच्या अधीन राहूनच केली जाते. यासाठी प्रत्येक मुलाची वैयक्तिक परिस्थिती, तिचे होणारे फायदे आणि संभाव्य धोके यांचा कसून अभ्यास करणे आवश्यक.


Childhood Obesity WHO Guidelines
Obesity Drugs Research : लठ्ठपणावरील औषधांमुळे वजन कमी होते; पण 'लाईफ क्वालिटी' सुधारत नाही! नवीन रिसर्चमध्‍ये काय आढळले?

मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक

लठ्ठपणाच्या उपचारांमध्ये केवळ शारीरिक आरोग्याचाच नव्हे, तर मानसिक आरोग्याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे या मार्गदर्शक तत्त्वात नमूद केले आहे. लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या मुलांना अनेकदा नैराश्य, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे अन्न आणि व्यायामासोबत त्यांचे संबंध बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक समस्यांचाही सुरुवातीलाच शोध घेऊन त्यावर योग्य उपचारांची दिशा ठरवली पाहिजे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news