Childhood Obesity : लहान मुलांमधील लठ्ठपणाला कारणीभूत ठरतात 'जीन्स'? 'BMI'वरील नवा रिसर्च काय सांगतोय?

मुलाच्या जन्माच्या वेळच्या वजनावर वडिलांपेक्षा आईच्या वजनाचा (BMI) जास्त प्रभाव पडतो
Childhood Obesity Genetics
Childhood Obesity Genetics (AI-generated image)Pudhari
Published on
Updated on

Childhood Obesity Genetics : मागील काही वर्षांमध्‍ये मुलांमधील वाढता लठ्ठपणा ही एक समस्‍या झाली आहे. फास्‍ट फूड आणि मैदानी खेळांचा अभावामुळे मुले लहान वयातच लठ्ठपणाची शिकार होत असल्‍याचे मानले जाते. मात्र आई-वडिलांचे वजन (BMI) आणि मुलांचे वजन यातील संबंधांमागे अनुवंशिकता (Genetics) हे एक मोठे कारण असू शकते, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

सुमारे ८६ हजार मुलांच्‍या माहितीचे विश्‍लेषण

'प्लॉस मेडिसिन' (PLOS Medicine) या प्रसिद्ध जर्नलमध्ये नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे. नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ', यूकेमधील 'ब्रिस्टल युनिव्हर्सिटी' आणि ऑस्ट्रेलियातील 'क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी'च्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी १९९९ ते २००९ दरम्यान जन्माला आलेल्या मुलांच्या डेटाचा वापर केला. यामध्ये मुलांच्या जन्माच्या वेळच्या वजनापासून ते वय ६ महिने आणि ८ वर्षांपर्यंतच्या BMI चा अभ्यास करण्यात आला. तसेच, मुलांचे वय ८ वर्षे असताना त्यांच्या खाण्याच्या सवयी कशा होत्या, हे देखील तपासले गेले.

Childhood Obesity Genetics
Junk Food Brain Damage Study | सावधान! लहानपणीचे जंक फूड मेंदूचे करू शकते 'लाइफटाईम' नुकसान; नवीन रिसर्च काय सांगतो?

संशोधनात काय आढळलं?

'नॉर्वेजियन मदर, फादर अँड चाइल्ड कोहोर्ट स्टडी' (१९९९ ते २००९ दरम्यान जन्मलेल्या मुलांचा अभ्यास) मधील माहितीचे विश्लेषण नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ आणि युनायटेड किंगडममधील ब्रिस्टल विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी केले.अभ्यासात असे आढळून आले की, आईचा 'बॉडी मास इंडेक्स' (BMI) आणि आठ वर्षांच्या वयातील तिचे मूल यांचा BMI यांच्यातील सांख्यिकीय संबंधांपैकी अंदाजे ७९ टक्के संबंध जनुकीय घटकांमुळे होता; तर वडिलांच्या बाबतीत हे प्रमाण ९४ टक्के होते.

Childhood Obesity Genetics
Child Brain : पालकत्व किंवा IQ नव्‍हे, मुलांच्या मेंदूच्‍या विकासावर होतो 'या' गोष्टीचा मोठा परिणाम! नवीन रिसर्च काय सांगतो?

पालकांचे वजन जास्‍त असल्‍यास...

पालकांचे वजन जास्त असल्यास मुलांमध्ये खाण्याच्या काही सवयी ( चवदार पदार्थांचे जास्त आकर्षण असणे किंवा मानसिक तणावाखाली जास्त खाणे) दिसून येतात. मात्र, खाण्याच्या या सवयींमागे पूर्णपणे अनुवंशिकताच कारणीभूत आहे का, हे हा अभ्यास ठोसपणे सांगू शकलेला नाही.

Childhood Obesity Genetics
Children's Diet : मुलांना कोणत्‍या वयात अंडे द्यावे? नवीन संशोधनाने पालकांची चिंता दूर केली!

मुल जन्‍माच्‍या वेळी आईचा वजनाचा जास्‍त प्रभाव

संशोधनानुसार मुलाच्या जन्माच्या वेळच्या वजनावर वडिलांपेक्षा आईच्या वजनाचा (BMI) जास्त प्रभाव पडतो. कारण गर्भावस्थेतील अंतर्गत वातावरणाचा बाळाच्या वजनावर थेट परिणाम होतो. संशोधकांच्या मते, गर्भावस्थेदरम्यान आईच्या वजनाचा पडणारा थेट जीवशास्‍त्रीय प्रभाव यापेक्षा पालकांकडून मुलांकडे येणारे 'जीन्स' (अनुवंशिकता) मुलांच्या वजनासाठी जास्त कारणीभूत ठरतात.

Childhood Obesity Genetics
Alzheimer's Risk Obesity |लठ्ठपणामुळे वाढू शकतो अल्झायमरचा धोका

वय २ ते ८ वर्षांच्या दरम्‍यान आईवडिलांच्‍या वजनाचा सारखा प्रभाव

बाळ जन्माला आल्यानंतर, वय २ ते ८ वर्षांच्या दरम्यान मुलाच्या वजनावर आई आणि वडील दोघांच्याही वजनाचा सारखाच प्रभाव पडत असल्याचे दिसून आले.

पालकांचे वजन जास्त आहे म्हणजे मुलांचेही वजन जास्त होणारच असे नाही

पालकांचे वजन जास्त आहे म्हणजे मुलांचेही वजन जास्त होणारच, असा याचा अर्थ अजिबात नाही, असा दिलासा संशोधकांनी दिला आहे. मुलांमध्ये जास्त BMI असण्याची जनुकीय लक्षणे असली, तरी त्यांना मिळणारे वातावरण, योग्य आहार आणि जीवनशैली याद्वारे या जनुकांचा प्रभाव बदलता येऊ शकतो, असेही संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Childhood Obesity Genetics
Foods For Deep Sleep: शांत आणि गाढ झोप हवीय? आजच डाएटमध्ये समाविष्ट करा 'हे' ६ पदार्थ

गरोदरपणात आईचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत गरजेचे

गरोदरपणात आईचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण आईच्या अतिवजनामुळे बाळ आणि आई दोघांच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असेही संशोधन अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news