

अमेरिकन हार्ट असोसिएशनने (AHA) अल्ट्राप्रोसेस्ड फूड्सबाबत (UPFs) महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या शास्त्रीय सल्ल्यानुसार, बहुतेक अल्ट्राप्रोसेस्ड फूड्स आरोग्यासाठी, विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी, अत्यंत घातक आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ उद्योग, व्यावसायिकांनी अशा पदार्थांचे उत्पादन थांबवावे आणि नियमकांनी त्यांना बाजारात येऊ देऊ नये, असा स्पष्ट संदेश AHA ने दिला आहे.
हृदयविकार, स्ट्रोक, टाइप २ डायबेटीस, स्थूलता यांसारख्या गंभीर आजारांशी अल्ट्राप्रोसेस्ड फूड्सचा (UPFs) थेट संबंध आहे. अमेरिकन लोक त्यांच्या दैनंदिन कॅलरीपैकी ५५% UPFs मधून घेतात; मुलांमध्ये हा आकडा ६२% पर्यंत आहे. दररोज एक अतिरिक्त अल्ट्राप्रोसेस्ड फूड (UPF) सेवन केल्यास हृदयविकाराशी संबंधित मृत्यूचा धोका ५०% ने वाढतो, स्थूलतेचा धोका ५५%, निद्रानाशाचा ४१%, टाइप २ डायबेटीसचा ४०%, आणि नैराश्याचा २०% वाढतो, असेही अमेरिकन हार्ट असोसिएशनने स्पष्ट केले आहे
AHA ने अल्ट्राप्रोसेस्ड फूड्सचे (UPFs) 3 गटात विभागले आहेत:
चांगले: संपूर्ण धान्य, ब्रेड, कमी साखर असलेले दही, टोमॅटो सॉस, शेंगदाणे/डाळीवर आधारित स्प्रेड, ताजे/फ्रोजन फळे-भाज्या, ओट्स, ब्राउन राईस, अनसाल्टेड नट्स, लो-फॅट दूध/दही, पाणी, कमी साखर/मीठ असलेले प्लांट-आधारित पदार्थ
मध्यम: पांढरा तांदूळ, पास्ता, फुल फॅट डेअरी, ताजे बनवलेले ब्रेड, सॉल्टेड नट्स, हलक्या सिरपमधील फळे, कॅन केलेली डाळ/फळे, हार्ड चीज, एग रिप्लेसमेंट्स, लो-सोडियम सूप, स्टोअर-बॉट जेवण (चांगल्या गटातील घटकांसह)
वाईट: रेड मीट, प्रोसेस्ड मीट (चिकन नगेट्स, सॉसेज), बटर, लार्ड, ट्रॉपिकल ऑइल्स (नारळ), सॉर क्रीम, १००% फळ रस, साखर, मध, मेपल सिरप, क्रॅकर्स, स्वीटेंड ड्राय/कॅन फळे, चिप्स, फ्रेंच फ्राइज, रिफाइंड ब्रेड/रोल्स, साखरयुक्त पेये, कुकीज, कँडी, आइसक्रीम, बॉक्स्ड मॅक्रोनी, इंस्टंट नूडल्स, पिझ्झा, काही सूप्स, सिरपमधील फळे.
जास्तीत जास्त ताज्या, नैसर्गिक घटकांपासून बनवलेले पदार्थ खा.
पॅकेज्ड पदार्थांची लेबल्स वाचा, त्यातील साखर, मीठ, फॅटचे प्रमाण तपासा.
घरगुती जेवणाला प्राधान्य द्या – संशोधनानुसार घरच्या जेवणाने वजन कमी करण्यास मदत होते, जरी 'आरोग्यदायी' UPFs खाल्ले तरीही ते घरगुती पदार्थांइतके फायदेशीर नसतात.
'Make America Healthy Again' (MAHA) उपक्रमांतर्गत, काही राज्यांत SNAP लाभार्थ्यांना केक्स, कुकीज, सोडा, कँडीसारखे UPFs खरेदी करता येणार नाहीत.
FDA आणि इतर नियामक संस्थांनी UPFs मधील कृत्रिम रंग, स्वीटनर्स, आणि इतर घटकांवर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे.
मोठ्या कंपन्या आता त्यांच्या उत्पादनांतून घातक घटक काढून टाकत आहेत, तर स्टार्टअप्स आरोग्यदायी पर्याय विकसित करत आहेत.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदर्शक सूचनांमुळे अल्ट्राप्रोसेस्ड फूड्सबाबत (UPFs) जनजागृती वाढली आहे. जरी काही UPFs 'आरोग्यदायी' मानले जात असले, तरीही ताज्या, कमी प्रक्रिया केलेल्या पदार्थांना प्राधान्य देणे हेच दीर्घकालीन आरोग्यासाठी उत्तम आहे. खाद्य उद्योग, धोरणकर्ते आणि ग्राहक यांनी मिळून आरोग्यदायी निवडी करणे ही काळाची गरज आहे.<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/rC4ygV2aaAU?si=lVGoiLC4b2Dc5i69" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>