Purandar Rice Mill Women Farmers: दक्षिण पुरंदरमध्ये महिला भात उत्पादकांची राईस मिल; पायाभरणीने नवे पर्व

उमेद अभियानांतर्गत महिलांचे शेतकरी उत्पादक कंपनीकडून राईस मिल उभारणी
Purandar Rice Mill
Purandar Rice MillPudhari
Published on
Updated on

परिंचे: दक्षिण पुरंदरमधील भात उत्पादक शेतकरी महिलांनी राईस मिलची पायाभरणी करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Purandar Rice Mill
PMRDA Baneshwar Road Work: नसरापूरमध्ये पीएमआरडीएच्या रस्ते कामावर आक्षेप; अंदाजपत्रक चुकल्याची अधिकाऱ्यांकडून कबुली

महाराष्ट्र राज्य ग््राामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्वराज्य महिला प्रभाग संघाच्या स्वयंसाहाय्यता समूहातील 503 महिला भागधारक महिलांना यासाठी पुढाकार घेतला. यांनी स्थापन केलेल्या किल्ले पुरंदर महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड या राईस मिलच्या बांधकामाचे भूमिपूजन प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

Purandar Rice Mill
Pune Vanchit Bahujan Aghadi Election: पुणे महापालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडी स्वबळावर, 41 प्रभागांत 58 उमेदवार

यावेळी गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक विश्वजित आसबे, विस्तार अधिकारी जेधे, मांढरच्या सरपंच शिल्पा शिर्के, ग््राामविकास अधिकारी शशांक सावंत, बँक ऑफ इंडियाचे बँक व्यवस्थापक सचिन दोलताडे, पुरंदर तालुका अभियान व्यवस्थापक नंदा कोरडे, व्यवस्थापक गणेश किकले, प्रभाग समन्वयक रमेश भंडलकर, स्मार्टच्या प्रसिदा पाटील, सोहम साळुंखे, स्वराज्य प्रभाग संघातील ग््रााम सखी, बचत गटातील महिला व ग््राामस्थ उपस्थित होते. पुरंदर तालुक्यात उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेले महिलांची शेतकरी उत्पादन कंपनी पहिलीच कंपनी आहे.

Purandar Rice Mill
Pune Municipal Election Criminals: पुणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 1500 उमेदवार; पोलिसांची कडक नजर

कंपनीच्या माध्यमातून राईस मिल उभारली जाणार आहे. येथे परिसरातील इंद्रायणी तांदूळ खरेदी करून क्लिनिंग, ग््रेाडिंग, पॅकेजिंग, बॅण्डिंग व एक्सपोर्ट असे नियोजन असल्याचे किल्ले पुरंदर राईस मिल कंपनीच्या संचालिका स्नेहल भाटे, संगीता बोरकर, सुप्रिया कोकरे, रूपाली तांबेकर, रेश्मा ढगारे, स्वाती जाधव, विद्या यादव, सविता पडळकर व प्रियंका पापळ आदींनी सांगितले.

Purandar Rice Mill
Rajgad Leopard Terror: राजगड घाट परिसरात बिबट्यांची दहशत; वेल्हे-राजगड तालुक्यात भीतीचे वातावरण

दक्षिण पुरंदरमध्ये भाताचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आता या मिलमुळे येथील शेतकऱ्यांना त्यांचे भातपीक प्रक्रियेसाठी कोठेही नेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशांची मोठी बचत होईल. याच पद्धतीने भविष्यात कंपनीच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास महिला सक्षमीकरण होण्यास चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

प्रणोती श्रीश्रीमाळ, गटविकास अधिकारी, पुरंदर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news