Akshaye Khanna Diet: १० तास झोपतो, डाएटही करत नाही तरी धुरंधर फेम अक्षय स्लीम कसा?

Anirudha Sankpal

अक्षय खन्ना कोणत्याही कडक डाएट प्लॅन फॉलो करत नाही, तर तो संतुलित आणि आनंददायी जीवनशैलीला प्राधान्य देतो.

त्याच्या दिनचर्येतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो सकाळचा नाश्ता (Breakfast) पूर्णपणे टाळतो आणि थेट दुपारचे जेवण करतो.

अक्षय दिवसातून केवळ दोनदाच जेवतो; दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण, या दोन वेळेच्या मधल्या काळात तो काहीही खात नाही.

संध्याकाळी तो फक्त एक कप चहा घेतो, त्याव्यतिरिक्त बिस्किट किंवा सँडविच सारखे पदार्थ खाणेही तो टाळतो.

शरीराला पूर्ण विश्रांती देण्यासाठी अक्षय दिवसातून सुमारे १० तास झोप घेतो, जे त्याच्या आरोग्याचे महत्त्वाचे गमक आहे.

अक्षयला घरगुती साधे जेवण आवडते; दुपारच्या जेवणात तो वरण-भात, एक भाजी आणि मासे किंवा चिकनचा समावेश करतो.

रात्रीच्या जेवणात तो हलका आहार घेतो, ज्यामध्ये प्रामुख्याने चपाती, एक भाजी आणि चिकनचा समावेश असतो.

शिस्तप्रिय आहार असूनही त्याला लिची, भेंडी आणि केक खायला खूप आवडते, तसेच तो गोड पदार्थांचाही चाहता आहे.

चित्रीकरण सुरू असो किंवा नसो, अक्षय आपल्या या ठराविक दिनचर्येत कोणताही बदल करत नाही.

येथे क्लिक करा