अंजली राऊत
सोप्या आणि नैसर्गिक सवयींचा अवलंब करून, कोणत्याही क्रीम किंवा खर्चाशिवाय तुमची त्वचा आतून निरोगी आणि बाहेरुन चमकदार ठेवू शकतात. दैनंदिन दिनचर्येत थोडासा बदल आणि सातत्यामुळे तुमचा चेहरा नेहमीच ताजा, स्वच्छ आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसतो.
सकाळी 10-15 मिनिटे सौम्य सूर्यप्रकाश घेणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळून त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी राहते.
या सर्व सवयी दररोज आणि योग्य पद्धतीने नियमित पाळणे महत्वाचे आहे. आहारात फळे ठेवा, त्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या क्रीमशिवाय आणि कोणत्याही खर्चाशिवाय चमक येते.
बाजारातील रासायनिक उत्पादने वापरणे थोड्याफार प्रमाणात टाळा आणि साधी जीवनशैली स्वीकारा. नैसर्गिक दिनचर्यामुळे त्वचा दीर्घकाळ निरोगी राहते.
दिवसातून दोनदा तरी अगदी साध्या पाण्याने चेहरा पूर्णपणे धुवा. त्यामुळे घाण आणि घाम निघून जातो आणि त्वचा ताजी राहण्यास मदत होते.
दिवसातून दररोज 8-10 ग्लास स्वच्छ पाणी पिल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार आणि स्वच्छ दिसतो.
तुमच्या दैनंदिन आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि सुकामेवा यांचा समावेश करा. हे तुमच्या त्वचेला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात, ज्यामुळे निखारवाली त्वचा होते
दररोज थोडा तरी हलका व्यायाम करा. जसे चालणे, योगा किंवा स्ट्रेचिंग करा. व्यायामामुळे रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
जास्त ताणामुळे त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसायला लागते. त्यासाठी ध्यान, खोलवर श्वास किंवा आवडीचे संगीत ऐका त्यामुळे तुमचे मन शांत होईल.