पुढारी वृत्तसेवा
पालकांनी घाबरू नका
अनेक मुलांचे वजन वयानुसार कमी असते. याचा अर्थ मूल आजारी आहेच असे नाही, असे पेडियाट्रिशियन सांगतात.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वाढवा
दूध, दही, पनीर, चीज यामध्ये प्रोटीन व कॅल्शियम भरपूर असते, जे वजन वाढीस मदत करते.
घरचे पौष्टिक फॅट्स द्या
तुप, लोणी, शेंगदाणा तेल, नारळ तेल योग्य प्रमाणात दिल्यास मुलांची कॅलरी इनटेक वाढते.
डाळी आणि प्रोटीन महत्त्वाचे
वरण, उसळी, चणा, राजमा, अंडी यामुळे स्नायू मजबूत होतात आणि निरोगी वजन वाढते.
दिवसातून थोडे-थोडे पण वारंवार खाऊ घाला
मुलांना एकदम जास्त खायला न लावता 2–3 तासांनी हलका पण पौष्टिक आहार द्या.
फळे आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करा
केळी, आंबा, चिकू, बदाम, काजू, मनुका वजन वाढीसाठी फायदेशीर ठरतात.
जंक फूड टाळा
चिप्स, पॅकेट फूड, जास्त साखर यामुळे वजन वाढते पण आरोग्य बिघडते
झोप आणि खेळही तितकेच महत्त्वाचे
पुरेशी झोप आणि मैदानी खेळामुळे भूक सुधारते व ग्रोथ हार्मोन योग्य प्रकारे काम करते.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
वजन खूपच कमी असेल किंवा वाढ थांबली असेल तर पेडियाट्रिशियनकडे तपासणी जरूर करा.