mental health| चिंता आणि अस्वस्थता कमी करायची आहे? नवीन संशोधन कोणता उपाय सुचवते?

हृदय आणि श्वसन तंदुरुस्ती असणाऱ्यांमध्ये रागाचे प्रमाण कमी
Exercise
ExercisePudhari
Published on
Updated on

mental health regular exercise benefits

आधुनिक जीवनशैलीत चिंता आणि अस्वस्थता हे आता कॉमन झाले आहे. धावपळीच्या जीवनशैलीत वाढत्या चिंतेवर (Anxiety) नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी 'नियमित व्यायाम' हे एक प्रभावी अस्त्र असल्याचे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. जाणून घेऊया या संशोधनाविषयी....

अशा व्यक्तींमध्ये रागाचे प्रमाण कमी

'हेल्थलाइन'च्या रिपोर्टनुसार, 'एक्टा सायकॉलॉजिका' (Acta Psychologica) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींची हृदय आणि श्वसन तंदुरुस्ती (Cardiorespiratory Fitness) उत्तम असते, त्यांच्यामध्ये रागाचे प्रमाण कमी आणि भावनिक लवचिकता अधिक असल्याचे दिसून आले आहे.

Exercise
Mental Health: क्रिकेट नाही तर 'या' खेळामुळं ६ वर्षे आयुष्य वाढू शकतं

कसे झाले संशोधन?

या संशोधनासाठी १८ ते ४० वयोगटातील ४० निरोगी व्यक्तींची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. अभ्यासादरम्यान असे आढळले की, तणावपूर्ण प्रसंगात कमी तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्ती अधिक शांत राहतात. विशेष म्हणजे, व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये चिंतेची पातळी मध्यमवरून उच्च होण्याचा धोका ७७५ टक्क्यांनी अधिक असल्याचे समोर आले आहे.

Exercise
Mental Health | मनशांती हवीय? नक्की ट्राय करा 'या' ६ सोप्या टिप्स

नियमित व्यायाम मनाच्या सदृढतेसाठीही पूरक

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निसा केयाशियन यांच्या मते, "उत्तम भावनिक आरोग्यासाठी शारीरिक हालचाल हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मी माझ्या रुग्णांना नेहमीच नियमित व्यायामाचा सल्ला देते." तसेच, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. कारिन विल्नर यांनी नमूद केले की, हा अभ्यास मानसिक समस्या नसलेल्या लोकांना तणावाचे नियोजन कसे करावे, हे समजून घेण्यास मदत करतो.

Exercise
Men's Mental Health : पुरुषांमधील मानसिक आरोग्याची समस्या गंभीर

व्यायामाचे फायदे

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नियमित व्यायामाचे सांगितलेले फायदे खालीलप्रमाणे...

  • नियमित व्यायामामुळे केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक व्याधींचा धोकाही कमी होतो:

  • हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेहाचे प्रतिबंधात्मक नियंत्रण.

  • मेंदूचे आरोग्य सुधारणे आणि चांगली झोप लागणे.

  • नैराश्य आणि चिंतेच्या लक्षणांमध्ये घट.

Exercise
Mental Health and Yoga : मानसिक शांती हवीय? या योगासनांचा दिनचर्येत समावेश करा

व्यायाम सुरू करण्यास अडथळे येत असल्यास काय करावे?

अनेकदा मानसिक अस्वस्थतेमुळे व्यायाम करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय खालील प्रमाणे...

  • १. छोट्या उद्दिष्टांनी सुरुवात करा: अगदी थोडा वेळ चालणे किंवा योगासने करणे याने सुरुवात करा आणि प्रगतीचा आनंद साजरा करा.

  • २. आवडती कृती निवडा: जो व्यायाम किंवा खेळ तुम्हाला आनंद देतो, तोच निवडा जेणेकरून त्यात सातत्य राहील.

  • ३. नोंदवही ठेवा: व्यायामानंतर तुम्हाला कसे वाटते (चांगले, वाईट किंवा सारखेच), याची नोंद ठेवा.

  • ४. व्यायामानंतर स्वतःला एखादा आवडता चित्रपट किंवा आवडीचा पदार्थ देऊन प्रोत्साहित करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news