खसखस आहे थंडीत वरदान ! शरीराला ऊर्जा ते तरुण दिसण्यापर्यंत आहेत औषधी गुण | पुढारी

खसखस आहे थंडीत वरदान ! शरीराला ऊर्जा ते तरुण दिसण्यापर्यंत आहेत औषधी गुण

विनायक सरदेसाई

खसखस खूप पौष्टिक असतो. त्याचा वापर रस्सा करण्यासाठी आणि हिवाळ्यात हलवा करण्यासाठी केला जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. खसखसचे अनेक गुण आहेत, त्यातील औषधी गुण समजावून घेऊ.

खसखस वेदनाशामक म्हणूनही वापरला जातो. त्यातील ओपियमअल्कलाईडस् सर्व प्रकारच्या वेदना शमवण्यामध्ये महत्त्वाचे ठरते. विशेषतः, स्नायूंच्या वेदना शमवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. खसखसचे तेल बाजारात उपलब्ध आहे. त्याचा वापर वेदना होणार्‍या जागी केला जातो.

बाळंतपण : बाळाच्या जन्मानंतर आईचा आहार कसा असावा?

श्‍वासासंबंधी त्रास होत असेल तर खसखस फायदेशीर असतो. त्याचबरोबर खोकला कमी करून श्‍वासासंबंधी त्रासामध्ये दीर्घकाळ आराम मिळण्यासही फायदेशीर असतेा. एखाद्या व्यक्‍तीला झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी खसखस वाटून गरम दुधात घालून प्यायला दिल्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे अनिद्रेची समस्या दूर होते. तसेच झोपही लागते.

खसखस हा तंतुमय घटकांचा उत्तम स्त्रोत आहे त्यामुळे खसखस वापरल्यास बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत नाही. त्याशिवाय उत्तम पचनासाठीही मदत होते. शरीराला ऊर्जा देण्यासाठी खसखस फायदेशीर असते.

‘कमी साखर’ही धोक्याचीच ! रक्‍तातील साखर कमी होण्याची लक्षणे कशी ओळखाल ?

मूतखड्यावर उपचार म्हणूनही खसखशीचे सेवन केले जाते. त्यातील ऑक्सालेटस, शरीरातील अतिरिक्‍त कॅल्शिअम शोषून घेतात आणि मुतखडा निर्मिती होण्यापासून बचाव करतात.

खसखस मानसिक तणावापासून मुक्‍ती देते तसेच त्वचेवर दिसणार्‍या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंटचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे व्यक्‍ती तरुण दिसण्यास मदत होते.

खसखस त्वचेला मुलायमपणा देण्यास मदत करते. त्वचेची जळजळ, खाज कमी करण्यासाठी तसेच एक्झिमा किंवा खरूज सारख्या समस्यांशी लढण्यास मदत करते.

रताळे : मुलांसाठी हिवाळ्यात रताळ्याचे सेवन ठरते लाभदायक

खसखशीमध्ये ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड, प्रथिने, तंतुमय घटक भरपूर असतातच शिवाय फायटोकेमिकल्स, बी जीवनसत्त्व, थायमिन, कॅल्शिअम आणि मँगनीज देखील असते. त्यामुळे पोषणाच्या द‍ृष्टीने खसखस खूप फायदेशीर असते.

त्वचा सुंदर बनवण्यासाठी खसखस दुधात वाटून फेसपॅक म्हणून लावल्यास फायदा होतो. त्वचा मुलायम होतेच पण नैसर्गिक चमकही मिळते.

त्याशिवाय अनेक प्रकारच्या लहान-लहान समस्या जसे जास्त तहान लागणे, ताप येणे, सूज किंवा पोटातील जळजळ यापासून मुक्‍ती मिळवण्यासाठी खसखस वापरली जाते. पोटात वाढलेली उष्णता शांत करण्यासाठी त्याची मदत होते.

हे ही वाचलं का ?

Back to top button