गोव्यात काँग्रेसने सोबत यावे, उत्तर प्रदेशातही शिवसेना शड्‍डू ठोकणार : संजय राऊत | पुढारी

गोव्यात काँग्रेसने सोबत यावे, उत्तर प्रदेशातही शिवसेना शड्‍डू ठोकणार : संजय राऊत

मुंबई,  पुढारी ऑनलाईन 

गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज केली. यानंतर गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना एकत्रित निवडणुक लढविणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी गोवा, आणि उत्तर प्रदेश या राज्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना असून दोघेजण मिळून एकत्रित निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगताना कॉग्रेसने सुद्धा आपल्यासोबत येण्यास माझी काहीही हरकत नसल्याचे म्हटले आहे. यानंतर त्यांनी कॉग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधीसोबत याबाबतचे बोलणं झालेलं असून त्यांनी ही आपले प्रखर मत व्यक्त करावे असे म्हटले आहे.

यानंतर राऊत यांना रोड शो, पदयात्रा आणि जाहीर सभांना बंदी घालण्यावर विचारण्यात आले तेव्हा वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर निवडणुक आयोगाने घातलेल्या नियम हे सर्वासाठी समान हवेत असे देखील म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान मतदान होईल. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी आणि मणिपूरमध्ये २७ फेबुवारी आणि ३ मार्च रोजी मतदान होईल. पाच राज्यांतील मतमोजणी १० मार्चला होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button