Mouth Sores : तोंड येण्‍याचा त्रास हाेताेय? वेळीच ‘हे’ उपाय करा | पुढारी

Mouth Sores : तोंड येण्‍याचा त्रास हाेताेय? वेळीच 'हे' उपाय करा

डॉ. निखिल देशमुख

तोंड येणे किंवा तोंडामध्ये जखम होणे ही एक सामान्य समस्या आहे. या जखमा दीर्घकाळ राहिल्या तर त्यातून रक्त येते. असा त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्या. कारण, या जखमा माऊथ आल्सरसुद्धा असू शकतात. (Mouth Sores)

तोंड येणे किंवा तोंडातील साल निघणे किंवा तोंडात जखम होणे यासारखा त्रास का होतो?

1) खूप जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने.

2) जास्त गरम पदार्थ आणि पेय पदार्थ सेवन केल्याने.

3) दातांची स्वच्छता व्यवस्थित न केल्याने.

4) ज्या खाद्यापदार्थांमध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांचे अधिक सेवन करणे.

5) ‘ब’ जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण शरीरात संतुलित नसणे.

6) एखाद्या खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असूनही तो पदार्थ वारंवार सेवन करणे.

यासारख्या कारणांमुळे तोंड येऊ शकते. तोंड आल्यानंतर प्रामुख्याने सामान्य, गंभीर आणि हेरपेटीफार्म अशा तीन प्रकारच्या जखमा दिसून येतात. साधारणपणे साल निघणे हे बहुतेक लोकांमध्ये दिसून येते. या प्रकारच्या जखमांचा आकार मोठा नसतो आणि जवळपास आठ ते दहा दिवसांत त्या बर्‍याही होता. (Mouth Sores)

गंभीर प्रकारचा त्रास दहापैकी नऊ व्यक्तींना होतो. अशा व्यक्तींच्या तोंडात होणार्‍या जखमांचा किंवा फोडांचा आकार मोठा असतो. तर हेरपेटीफार्म प्रकारच्या जखमा जास्त करून दहा ते चाळीस वर्षांपर्यंत वयाच्या लोकांना होतात. त्यांचाही आकार फार मोठा नसतो. त्यांना पिनपॉईंट अल्सरच्या नावाने ओळखले जाते. दहा टक्के लोकांना हा त्रास असतो.

ज्या लोकांना तोंड येण्याचा त्रास खूप असतो त्यांनी आपल्या आहारात ‘क’ जीवनसत्त्वचा खासकरून समावेश करावा. मसालेदार आहार करू नये. भरपूर पाणी प्यावे आणि फळे खावीत. तसेच हा त्रास असणार्‍यांनी बद्धकोष्टता होऊ देऊ नये.

हेही वाचा;

Back to top button