Vitamin D Deficiency : ‘ड’ जीवनसत्त्व खूपच महत्त्‍वाचे, जाणून घ्‍या याच्‍या अभावामुळे हाेणार्‍या राेगांविषयी | पुढारी

Vitamin D Deficiency : 'ड' जीवनसत्त्व खूपच महत्त्‍वाचे, जाणून घ्‍या याच्‍या अभावामुळे हाेणार्‍या राेगांविषयी

दैनंदिन आहारात ‘ड’ जीवनसत्त्व असणे खूप महत्त्वाचे ठरते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे अस्थिरोग होण्याची शक्यता अधिक असते. पण आता त्या जोडीला ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावाचा परिणाम मेंदूवरही होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ( Vitamin D Deficiency)

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व हे शरीरातील अन्य अवयव व पेशींच्या वाढीसह मेंदूसाठी पोषक असल्याचे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याचा प्रयोग एका प्रयोगशाळेतील उंदरांवर केला. त्यांना काही महिने ‘ड’ जीवनसत्त्वाच अभाव असलेले अन्न दिले. हे अन्न देत असताना त्याची वारंवार चाचणीही करण्यात आली. या चाचणीमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उंदरांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून आले.तसेच मेंदूत असलेल्या रिडॉक्स प्रोटे ओमिक्सचीही मोठी हानी होऊन त्यांच्या स्मृती आणि आकलनशक्ती मध्ये घट झाल्याचेही दिसून आले.

Vitamin D Deficiency  : ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी तपासून घ्यावी

‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास मध्यमवयीन ते वृद्धापकाळात मेंदूवर काय परिणाम होऊ शकतो, याचा शोध या संशोधनातून घेण्यात आल्याचे संशोधक प्रमुख, सेंटर ऑफ मेम्ब्रेन्स सायन्सचे संचालक रसायनशास्त्राचे प्राध्यापक ॲलन बटरफील्ड यांनी सांगितले. त्यांच्यामते, सर्वांनी आपल्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी तपासून घ्यावी. कमी असेल तर त्या काळात ‘ड’ जीवनसत्त्व असलेला आहार अधिक घ्यावा. किंवा ‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या घ्याव्यात किंवा रोज १० ते १५ मिनिटे कोवळे ऊन अंगावर घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.सूर्याचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाच्या पातळीत वाढ होऊन मेंदूची सुरक्षा करण्यास मदत होते.

संबंधित बातम्या

हेही वाचा : 

Back to top button