भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या अहवालानुसार, भारतात दिल्ली, महाराष्ट्र, बंगळुरु आणि भोपाळमध्ये सारकोमाचे रुग्ण आढळून येतात. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी या उपचारांच्या माध्यमातून सारकोमावर मात करता येऊ शकते, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. किरण खरात यांनी दिली. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमांतर्गत भारतातील लोकसंख्या आधारित कर्करोग नोंदणीचा आढावा घेतला जातो. यामध्ये सारकोमाचे प्रमाणही नियमितपणे तपासले जाते. हाडांचा हा कर्करोग सुमारे 95 वर्षांपूर्वीचा असला तरी त्याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे.