Back Pain : पाठदुखी जगासमोरील मोठे संकट, तीन वर्षांत वाढले सुमारे १२ कोटी रुग्ण! | पुढारी

Back Pain : पाठदुखी जगासमोरील मोठे संकट, तीन वर्षांत वाढले सुमारे १२ कोटी रुग्ण!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आधुनिक जीवनशैलीत भौतिक सुखांची वाढ झाली मात्र आरोग्‍याच्‍या अनेक तक्रारी जाणवत आहेत. मागील काही वर्षात पाठदुखी ( Back Pain) जगासमोरील मोठे संकट म्‍हणून उभे राहले आहे. तीन वर्षांमध्‍ये पाठदुखीने ग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे १२ कोटींनी वाढले आहेत. Lancet Rheumatology Journal मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे की, २०५० पर्यंत जगात पाठदुखीने ग्रस्त लोकांची संख्या ८० कोटीपेक्षा अधिक होईल.

‘या’ कारणांमुळे वाढत आहेत जगभरात पाठदुखीचे रुग्‍ण

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास Lancet Rheumatology Journal मध्ये प्रकाशित झाला आहे. चुकीची जीवनशैली, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता, लठ्ठपणा, धूम्रपान, खाण्याच्या चुकीच्‍या सवयी या प्रमुख कारणांमुळे पाठदुखीचे रुग्ण वाढत आहेत. रुग्‍णसंख्‍या अशीच वाढत राहिली तर आगामी काळात या आजाराने महामारीचे रूप धारण करेल, असा दावाही या अहवालात करण्‍यात आला आहे.

Back Pain : ३० वर्षांतील डेटाचे विश्लेषण

संशोधकांनी गेल्या ३० वर्षांतील डेटाचे विश्लेषण केले. यामध्‍ये असे आढळले की, आशिया आणि आफ्रिकेमध्ये सतत वाढणारी लोकसंख्या आणि वृद्ध लोकसंख्येच्या वाढीमुळे पाठदुखीने ग्रस्त लोकसंख्येत वाढ दिसून येणार आहे. पाठदुखीसाठी मर्यादित उपचार पर्यायांमुळे ही समस्या अधिकच वाढली आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.

तीन वर्षांत वाढले सुमारे १२ कोटी रुग्ण वाढले

Lancet Rheumatology Journal अहवालानुसार, २०१७ च्या तुलनेत २०२० मध्ये पाठदुखीने ग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे १२ कोटींनी वाढली आहे. २०२० मध्ये जगभरात पाठदुखीने ग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे ७० कोटीवर पोहोचली होती. हे जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे आठ टक्‍के आहे. पाठदुखीचा त्रास हा प्रौढ व्‍यक्‍तींना होता, असा एक समज होता. मात्र नवीन संशोधनानुसार पाठदुखी वृद्ध लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना पाठदुखीचे प्रमाण जास्त असते. मात्र आता तरुण रुग्‍णांची संख्‍याही वाढली आलहे.
या संशोधनाचे प्रमुख संशोधक प्रो. मॅन्युएल फरेरा यांनी म्‍हटले आहे की, आमचे विश्लेषण जगभरात पाठदुखीच्या समस्येने ग्रस्त लोकांच्या संख्येत वाढ दर्शवते. यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण वाढत आहे. याला सामोरे जाण्यासाठी संशोधनाच्या पायावर आधारित सुसंगत दृष्टिकोन प्रस्थापित करण्याची गरज आहे. सामान्य उपचार कुचकामी असल्याचे आढळले आहे, काहींमध्ये शस्त्रक्रिया आणि ओपिओइड्सचा समावेश आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

Back Pain : नियमित व्‍यायामाबरोबर संतुलित आहारही हवा

पाठीदुखीवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात की, नियमित व्‍यायामाने रक्ताभिसरण सुधारेल. वेदना वाढल्या तरच फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डीची कमतरता असल्यास हाडांमध्ये वेदना होतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू नये म्हणून पौष्टिक अन्न खावे लागते. व्हिटॅमिन-डीची पूर्तता करण्यासाठी औषध आहे, परंतु सकाळच्या उन्हात थोडा वेळ घालवला तर चांगले फायदे होतो. हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्‍वाचे आहे. शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळण्यासाठी चीज, दही, बदाम, तांदूळ, सोया, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे फायद्‍याचे ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा : 

 

Back to top button