Health Sector : आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी केंद्र प्रयत्नरत – पंतप्रधान मोदी | पुढारी

Health Sector : आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी केंद्र प्रयत्नरत - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, ७ एप्रिल, पुढारी वृत्तसेवा; केंद्र सरकार आरोग्य क्षेत्रातील Health Sector पायाभूत सुविधा बळकट करण्यासह गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहे,असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा देतांना केले.

जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा Health Sector आयोजित केली होती. डब्ल्यूएचओच्या स्थापनेची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या ग्रहांना निरोगी ठेवण्याचे काम करणाऱ्या सर्वांचे आभार, अशा शब्दात पंतप्रधानांनी ट्विटरवरून जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

‘वसुधैव कुटुंम्बकम’ भारताचा वारसा असून यानुसार देश पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आरोग्य क्षेत्रात जगाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करीत आहे. कोरोना काळात संपूर्ण जगात औषधांचा तुटवडा होता. मात्र, भारताने १८० हून अधिक देशांमध्ये औषधी तसेच लस उपलब्ध करवून दिली होती. अशात जागतिक आरोग्य दिनानिमित्त संपूर्ण जगाच्या आरोग्याची कामना करीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. Health Sector
हे ही वाचा :

Back to top button