Relief From Back Pain : सोप्या पद्धतीने पाठदुखीला करा बाय बाय | पुढारी

Relief From Back Pain : सोप्या पद्धतीने पाठदुखीला करा बाय बाय

पुढारी ऑनलाईन डेस्क : हल्ली महिलांमध्ये पाठदुखीचे प्रकार खूप वाढला आहे. शिलाई मशीनवर एकसारखे बसून काम करणाऱ्या महिला, एकाच ठिकाणी तासनतास बसून, ओझे उचलून देखील पाठ दुखायला लागते. (Relief From Back Pain : सोप्या पद्धतीने पाठदुखीला करा बाय बाय) आजकाल पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. दैनंदिन काम करताना ही पाठदुखी सतावत असते. जर वेदना तीव्र झाल्यातर पाठदुखीचा त्रास अधिक होऊ शकतो. यावर काही सोप्या उपायांनी तुम्हाला पाठीचे दुखणे कमी करता येऊ शकतो. पण, या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवायला हवे. (Relief From Back Pain : सोप्या पद्धतीने पाठदुखीला करा बाय बाय)

कधी कधी मानेच्या खालच्या बाजूने, कधी पाठीच्या कणाजवळ, कधी एका बाजूनला पाठ दुखते तर कधी संपूर्ण पाठीचे दुखणे माकड हाडापर्यंत पोहोचते. काही अंशी यासाठी आपणचं जबाबदार असतो. आपली बदललेली शैली याला कारणीभूत आहे. एकसारखे कष्ट करणे, खूप वेळ वाकून काम करणे, यासारखी अनेक गोष्टी पाठदुखीसाठी कारणीभूत आहे. किरकोळ पाठदुखीवर आपण मेडिकल मधून औषधे आणून खातो. पण, तात्पुरत्या स्वरुपाचा आरामाचा काही उपयोग होत नाही. पुढे जाऊन ही समस्या आणखी वाढते. किरकोळ स्वरुपाचे दुखणे असतानाच डॉक्टरांकडे तापसणीसाठी जाणे खूप महत्त्वाचे आहे.

पाठ दुखण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधी कधी तुमच्या पाठीवर अचानक ताण येतो. जड वस्तू उचलल्यामुळेही पाठीच्य स्नायूंवर ताण येऊन पाठ दुखू लागते. वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ होतात किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळेही पाठ दुखू लागते. डोक्यावर ओझी वाहणारे कामगार, वाकून काम करमारे शेतकरी, ऑफिस कर्मचारी, शिलाई मशीनवर अथवा खुर्चीवर पाठीला कुठलाही आधार न घेता एकाजागी बसणाऱ्या व्यक्तींची पाठ दुखू लागते. हाय हिल्स शूड किंवा सँडल वापरणाऱ्यांनाही पाठदुकीचा त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला माहितीये का, हा ताण काही रोजच्या व्यायामाने बरा होऊ शकतो. ज्यामुळे तुमची पाठ मजबूत होईल.

तीव्र दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका

पाठ किरकोळ दुखत असताना डॉक्टरांना जा. दिलेल्या औषधाने पाठदुखीची कायमची राहिली तर घाबरण्याचे कारण नाही. पण पाठदुखी कायम राहिल्यास, डॉक्टर तुम्हाला काही औषधे सोबत एमआरआय किंवा एक्स-रे काढायला सांगतील. पण वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, किरकोळ बाहेरील औषधे आणून खाऊ नका. निदान झाल्याशिवाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपचार करू नये.

उपचार –

किरकोळ पाठीचे दुखणे असेल तर तुम्हाला व्यायाम करायला हवा. किंबहुना, असे दुखणे मागे लावू नये, यासाठी रोज व्यायाम करणे हा चांगला पर्याय आहे. चालणे हा उत्तम उपाय आहे. तुम्ही पोहूदेखील शकता. पर्वतासन, बालासन, मलासन यासारखी आसनेदेखील करू शकता.

छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. जड वस्तू पटकन उचलू नका, जेणेकरून पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंवर ताण येऊ नये. पाठीचे व्यायाम करणे. खूप वेळपर्यंत एका जागी बसू नये. मधून मधून उठून चालावे. र्खुीवर बसताना पाठीला आधार मिळेल, अशा खुर्च्या बाजारात उपलब्ध आहेत. त्या वापराव्यात. अथवा Back Pillows उपलब्ध होतात, त्या वापराव्यात, पाठीला विनाआधाराशिवाय बसू नये. ऑफिस असो वा दुसरे कामाचे ठिकाण पाय खाली लोंबकळत ठेऊ नये. जमिनिला पाय टेकवावेत.

काही चांगल्या तेलाने मालिश केल्यानेही पाठदुखीपासून आराम मिळतो. मध्ये मध्ये हातापायांची हालचाल ठेवावी. खासकरून कॉम्युटरवर काम करमाऱ्या व्यक्ती एका जागी खिळून असतात, त्यांनी मध्ये मध्ये हालचाल करत मुद्रा बदलावी, तुम्ही सकाळ संध्याकाळ सूर्यनमस्कारही घालू शकता. कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. दूध, कलिंगड, बदाम, अक्रोड, फळे, पालेभाज्या, सब्जा बिया, फ्लॅक्स सीड्स, भोपळ्याच्या हिरव्या बिया, अंडी, चिकन वगैरे.

Back to top button