Virat-Anushka : महाकालच्या दर्शनाला पोहोचले विराट-अनुष्का (Video) | पुढारी

Virat-Anushka : महाकालच्या दर्शनाला पोहोचले विराट-अनुष्का (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकालच्या दरबारी उपस्थिती लावली. विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमधील परफॉर्म काही खास नव्हता. टीम इंडियालादेखील इंदौरमध्ये खेळलेल्या तिसरे टेस्ट मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभवानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहली अनुष्कासोबत उज्जैनला पोहोचला. या दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्माने शनिवारा (४ मार्च) रोजी सकाळी महाकालच्या दरबारी उपस्थिती लावली. विराट-अनुष्काने भस्म आरतीमध्ये सहभाग घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीने गळ्यात रुद्राक्षची माळ आणि पारंपरिक पोशाख धोती घातली होती. त्याच्या कपाळी चंदनचा लेपदेखील लावला होता. तर अनुष्का साडीमध्ये दिसली.

विराट कोहलीने यावर्षी जानेवारीत वृंदावनची यात्रा केली होती. यावेळी त्याने वृंदावनमध्ये श्री परमानंद जी यांचे आशीर्वाद घेतले होते. जानेवारी महिन्यात विराट-अनुष्का ऋषिकेशच्या दयानंद गिरि आश्रममध्ये पोहोचला होता. तेथे दोघे एका धार्मिक विधीमध्ये सहभागी झाले होते.

Back to top button